जयपूर : राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर तिने पतीचा मृतदेह घरात ठेवून ती सासूकडे राहायला गेली. विशेष म्हणजे आरोपी महिलेचं मृतकासोबत सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. तरीही सहा महिन्यात तिने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर सासूला हत्या केल्याचंही सांगितलं. तिच्या सासूला ते खरं वाटलं नाही. पण जेव्हा पोलिसांचा फोन गेला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.
संबंधित घटना ही डुंगपूर जिल्ह्यातील साबल पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. मृतक तरुणाचं नाव नाथू यादव असं आहे. त्याने सहा महिन्यांपूर्वी कांता नावाच्या विधवेसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर ते दोघे मुगेड गावात राहण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी भाड्याने घर घेतलं होतं. दोघेही मजूर करायचे. या दरम्यान, 23 ऑगस्टला कांता आपल्या मुगेड येथील घरातून बाहेर पडली होती. तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ती खोलीला लॉक लावताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर ती खोली उघडली गेलीच नाही.
अखेर शुक्रवारी (27 ऑगस्ट) घरातून दुर्गंध आणि किडे बाहेर पडताना दिसले. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घराचा दरवाजा तोडला तेव्हा नाथूचा मृतदेह आढळला. त्याचा मृतदेह काळा पडला होता. त्या मृतदेहाचा अवतीभोवतीच किडे जमले होते. पोलिसांनी नाथूच्या आईसोबत संपर्क करत मुलाच्या मृत्यूची माहिती दिली.
पोलिसांनी नाथूची आई बेवा यादव (वय 65) यांच्यासोबत बातचित केली तेव्हा तिने आपल्या सूनेविषयी माहिती दिली. आपली सूनदेखील मुलासोबत राहत होती. पण ती 23 ऑगस्टला घरी आली आणि मुलाची हत्या केली, असं तिने सांगितलं. पण आपल्याला खरं वाटलं नाही, असं नाथूच्या आईने सांगितलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता नाथूच्या आईच्या जबाबामध्ये काहीतरी तथ्य असल्याचं आढळलं. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये नाथूची पत्नी कांता ही घरातून बाहेर पडून दरवाज्याला लॉक लावताना दिसतेय. त्यानंतर ती परत दरवाजा उघडतच नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातही पत्नीकडून पतीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांना 10 ऑगस्टला न्यू फ्रेंड्स कॉलीनत सुखदेव विहारजवळ नाल्यात पडलेल्या एका सुटकेसमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता संबंधित घटना खरी असल्याचं उघड झालं. मृतकाचा चेहरा कुजलेला होता. त्यामुळे त्याची ओळख पटणं कठीण होतं. मृतदेहाच्या उजव्या हाताला नवीन असं लिहिलेला टॅटू होता. तसेच त्याच्या उजव्या हातात एक स्टीलचा कडाही मिळाला. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास केला असता मृतकाच्या पत्नीनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केल्याचं उघड झालं.
हेही वाचा :