धक्कादायक! डॉक्टर नाही म्हणून कम्पाऊंडरकडून नसबंदीच ऑपरेशन, महिलेच काय झालं?

| Updated on: Apr 22, 2024 | 12:22 PM

वैद्यकीय दुर्लक्षाच एक गंभीर प्रकरण समोर आलय. आतापर्यंत अनेकदा डॉक्टरच्या अनुपस्थितीत कम्पाऊंडरने ऑपरेशन केल्याच आपण ऐकलं आहे. आता सुद्धा तसच घडलं आहे. नसबंदीच ऑपरेशन क्लिनिकमध्ये डॉक्टर नाही म्हणून कम्पाऊंडरने केलं.

धक्कादायक! डॉक्टर नाही म्हणून कम्पाऊंडरकडून नसबंदीच ऑपरेशन, महिलेच काय झालं?
Doctor
Follow us on

वैद्यकीय क्षेत्रातील गलथानपणाच, दुर्लक्षाच एक गंभीर प्रकरण समोर आलय. एका 28 वर्षीय महिलेला यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरच्या अनुपस्थितीत कम्पाऊंडरने शस्त्रक्रिया केल्यामुळे हे सर्व घडलं. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील एका खासगी क्लिनिकमध्ये शनिवारी एका महिलेचा मृत्यू झाला. बबिता देवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी क्लिनिकमध्ये जबरदस्त गोंधळ घातला. आपल आता काही खरं नाही, हे लक्षात आल्यावर कम्पाऊंडरने क्लिनिकमधून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु आहे.

बबिता देवी पाटण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसरीघारारी शहरातील वॉर्ड नंबर 14 मध्ये रहायच्या. शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास पाटोरी रोडवर असलेल्या अनिषा हेल्थ केअर सेंटरमध्ये बबिता देवीला आणलं. “त्यावेळी कम्पाऊंडर आणि अन्य स्टाफने डॉक्टर क्लिनिकमध्ये नसल्याच त्यांना सांगितलं. त्यानंतर कम्पाऊंडरने आपण नसबंदी शस्त्रक्रिया करु शकतो असं तिच्या कुटुंबीयांना पटवून दिलं. ते राजी झाले” मुसरीघारारीचे पोलीस अधिकारी फैझुल अन्सारी यांनी ही माहिती दिली.

कुटुंबीयांची परवानगी न घेताच दुसऱ्या क्लिनिकमध्ये हलवलं

“बबिता देवीला सकाळी 11 च्या सुमारास ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. तिला सलाईन चढवलं. पण तासाभरानंतर तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला तिथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या खासगी क्लिनिकमध्ये हलवलं. यासाठी तिच्या कुटुंबीयांची परवानगी घेतली नाही. दुसऱ्या क्लिनिकमध्ये तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर तिचा मृतदेह परत मूळ क्लिनिकमध्ये परत आणण्यात आलं” असं अन्सारी यांनी सांगितलं.

स्टाफ विरोधात एफआयआर

बबिता देवीचा मृत्यू झाल्याच समजल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी अनिषा हेल्थ केअर सेंटर बाहेर आंदोलन सुरु केलं. क्लिनिकचा मालक आणि डॉक्टरला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. कारण त्याने सर्जरी करणं अपेक्षित होतं. डॉक्टर आणि क्लिनिकमधील अन्य स्टाफ विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.