मुंबई : मुंबई उपनगरात गोवंडी येथे एका खासगी रुग्णालयात महिला रुग्णाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी एक बोगस डॉक्टर आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या आऊट पेशंट विभागात महिलेचा विनयभंग झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली.
पीडित महिलेचा पती रुग्णालयाच्या वेटिंग एरियामध्ये थांबला होता. पत्नी बराचवेळ झाला, तरी OPD च्या बाहेर का आली नाही? म्हणून तो आतमध्ये पहायला गेला. त्याचवेळी त्याने बोगस डॉक्टरला विनयभंग करताना पकडलं, असं महिलेच्या पतीने सांगितलं.
पोलीस तपासात काय समोर आलं ?
या जोडप्याने रुग्णालयात गोंधळ घातला व त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी तपास केला. त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या आरोपीकडे कुठलीही वैद्यकीय डीग्री नव्हती, असं तपास अधिकाऱ्याने सांगितलं. आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय.