Rape on Women | तिने मित्र म्हणून विश्वास ठेवला. पण त्याने दगा दिला. आठवडाभर एक महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पारस (28) असं आरोपीच नाव आहे. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केला, सोबत त्याने तरुणीला खूप त्रास दिला. बलात्कार आणि शारीरिक छळ या आरोपांखाली पारसला 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. 30 जानेवारीला ही घटना उजेडात आली. नेब सराई पोलीस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला. त्यामध्ये महिलेला तिचा नवरा मारहाण करत असल्याची माहिती देण्यात आली.
कॉल येताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची सुटका केली व तिला एम्स रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात तिला आणलं, त्यावेळी तिच्या शरीरावर 20 जखमा होत्या. पारसशी ओळख झाल्यानंतर पीडित महिला तीन-चार महिन्यापासून त्याच्या संपर्कात होती. तिला घरकामाची एक नोकरी मिळाली होती. त्यासाठी तिने बंगळुरुला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोहोचण अपेक्षित होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
लैंगिक शोषण केलं
पारसने आठवडाभर तिला माराहण केली. तिचं लैंगिक शोषण केलं. शारीरिक छळ करताना त्याने तिच्या अंगावर गरम डाळही एकदा फेकली होती. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन 30 जानेवारीला आरोपीविरोधात FIR नोंदवण्यात आला. कलम 323, 376 (बलात्कार) आणि कलम 377 लावण्यात आलं आहे. आरोपी पारस उत्तराखंडचा रहिवाशी आहे. दिल्लीतील एक उपहारगृहात तो आचारी म्हणून नोकरी करतो. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.