बंगळुरु : नवरा-बायकोच नात हे विश्वासाच्या पायावर उभ असतं. पण एकदा विश्वासाला तडा गेला की, संसाराची वाट लागयला वेळ लागत नाही. अशाच एका प्रकरणात नवऱ्याच्या वर्तनामुळे पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणात नवरा त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी बायकोवर दबाव टाकत होता. जेव्हा बायकोने, त्याची विकृत मागणी धुडकावून लावली, त्यानंतर त्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. मंगळुरु येथे राहणाऱ्या मुलाबरोबर तिच 2007 साली लग्न झालं. या जोडप्याला 11 आणि 10 वर्षाची दोन मुलं आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी नवऱ्याने तिच्यासोबत छोट्या-छोट्या विषयावरुन तिच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सुद्धा तो देत नव्हता, असं तिने पोलिसांना सांगितलं.
मंगळुरुमध्ये राहत असताना ती नवऱ्याचा फोन वापरत होती. कारण तिचा फोन खराब झाला होता. नवऱ्याचा फोन वापरताना तिला एक धक्कादायक बाब समजली. नवऱ्याने पती-पत्नींमधील शरीरसंबंधांबद्दल त्याच्या तीन मित्रांना मेसेज केले होते. शरीरविक्रीय करणारी महिला किती पैसे घेते? असं सुद्धा त्याने मेसेजमध्ये विचारल होतं. जेव्हा तिने याबद्दल नवऱ्याला जाब विचारला, त्यावर त्याने कुटुंबीयांना काही सांगितलं, तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय?
बंगळुरुला शिफ्ट झाल्यांतर नवऱ्याने तिच्यावर त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तो तिच्या मागे लागला होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने मारहाण केली. “आम्ही महिलेच्या नवऱ्याला बोलावलं आहे. त्याची बाजू ऐकून घेतल्यानतंर आम्ही आवश्यक कारवाई करु” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.