Charles Sobhraj : बिकिनी किलर म्हणून कुप्रसिद्ध असलेला चार्ल्स शोभराज याची तुरुगांतून सूटका होणर आहे. आतापर्यंत त्याने अनेक खून केले आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना अनेक प्रयत्न करावे लागले. पण त्यानंतर ही अनेकदा तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
चार्ल्स शोभराज आता तुरुंगातून मुक्त होणार आहे. जगातील सर्वात सर्वात वादग्रस्त गुन्हेगार आणि सिरीयल किलर चार्ल्स शोभराज याला दोन अमेरिकन मुलींच्या हत्येच्या गुन्ह्यात नेपाळमध्ये अखेरचा तुरुंगवास भोगावा लागला होता, तो आता 19 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येत आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची चांगली वागणूक आणि वाढते वय लक्षात घेऊन त्याची शिक्षा पूर्ण होण्याच्या एक वर्ष आधी तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
तुरुंगातून सुटल्यानंतर 15 दिवसांत त्याला फ्रान्सला हद्दपार करण्याचे आदेशही दिले. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी 78 वर्षीय शोभराजच्या याचिकेवर निर्णय देताना सांगितले की, त्याला सतत तुरुंगात ठेवणे मानवाधिकारानुसार नाही.
2003 मध्ये नेपाळमध्ये अटक
नेपाळची राजधानी काठमांडू येथील कॅसिनोमधून चार्ल्सला 2003 मध्ये अखेरची अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर नेपाळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 28 वर्षे जुना खटला पुन्हा सुरू केला होता. ज्यामध्ये त्याच्यावर बनावट पासपोर्टसह प्रवास केल्याचा तसेच अमेरिकन आणि कॅनेडियन तरुणीच्या हत्येचा आरोप आहे. या आरोपावरून त्याला 2004 साली 20 वर्षांची शिक्षा झाली होती.
चार्ल्सवर अनेक भयंकर गुन्हे दाखल आहेत. नेपाळच्या तुरुंगात बंद असताना त्याने परदेशी मीडियाला मुलाखत दिल्याने जगभरात खळबळ उडाली होती. चार्ल्स शोभराजची गणना जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारांमध्ये केली जाते.
चार्ल्स शोभराज याने 1972 मध्ये थायलंडमध्ये पाच मुलींची हत्या केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याचे बिकिनी किलर असे नाव पडले. चार्ल्सला फाशी होणार हे जवळपास निश्चित होते. पण त्याला ही शिक्षा 20 वर्षांच्या आत मिळायला हवी, अशी कायद्यात अट होती. चार्ल्सने याचाच फायदा घेतला.
चार्ल्सला कोणत्याही किंमतीत थायलंड पोलिसांच्या हातात सापडायचे नव्हते. त्यानंतर तो 1976 मध्ये भारतात पकडला गेला. येथे काही फ्रेंच पर्यटकांना मादक पदार्थ पाजून लुटल्याचा त्याच्यावर आरोप होता. अटकेनंतर त्याला देशातील सर्वात सुरक्षित दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. शिक्षेनंतर 1986 मध्ये त्याची सुटका होणार होती. येथून सुटका झाल्यानंतर त्याला थायलंडला पाठवले जाणार होते. त्यामुळे तेथे त्याला मृत्यूदंड होणार होता. मग त्याने येथून पळून जाण्याची योजना आखली.
तिहारमध्ये वाढदिवस असल्याचे सांगून सर्व कैद्यांना आणि अधिकाऱ्यांना नशेत मिठाई खाऊ घातली. सगळे बेशुद्ध झाल्यानंतर तो तुरुंगातून फरार झाला. मग तो थेट गोव्याला पोहोचला.नंतर त्यानेच पोलिसांना फोन करुन त्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली. पुन्हा त्याला अटक झाली . त्यानंतर तो १९९६ मध्ये तुरुंगातून सूटला. ज्यामुळे त्याची थायलंडच्या गुन्ह्यातून कायमची मुक्तता झाली.
1996 मध्ये त्याला भारतातून हद्दपार करून फ्रान्सला पाठवण्यात आले. पण नेपाळमध्ये त्याने केलेल्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली चार्ल्सला 2003 साली काठमांडूमध्ये अटक करण्यात आली होती. आणि तेव्हापासून तो तिथल्या तुरुंगातच होता. त्याचा जन्म 1944 मध्ये व्हिएतनाममध्ये झाला होता. त्याची आई व्हिएतनाम वंशाची तर वडील भारतीय वंशाचे होते. पुढे चार्ल्सची आई व्हिएतनाममध्ये एका फ्रेंच सैनिकाला भेटली. ज्याने चार्ल्सला फ्रेंच नागरिकत्व देऊन चार्ल्सला तसेच त्याच्या आईला दत्तक घेतले. पण लहान वयातच म्हणजे १९६३ साली चार्ल्सला चोरीच्या गुन्ह्यासाठी फ्रान्समधील पॉईसी तुरुंगात पहिल्यांदा तुरुंगवास भोगावा लागला आणि इथूनच त्याचा गुन्हेगारीच्या जगात असा प्रवेश झाला.
चार्ल्सने 1975 साली थायलंडमध्ये पहिली हत्या केल्याचे सांगितले जाते. त्याने 1975 मध्ये स्विमिंग पूलमध्ये एका पर्यटकाची हत्या केली होती. त्यानंतर त्याने दक्षिण पूर्व आशियातील १२ पर्यटकांची हत्या केली होती. याठिकाणी पाण्यात बुडवून, गळा दाबून, भोसकून आणि जिवंत जाळून त्यांची हत्या करण्यात आली. तो दिसायला अतिशय आकर्षक असल्याने मुलींना सहजतेने आकर्षित करायचा. तो मुलींना आधी फसवायचा आणि नंतर त्यांचा खून करुन फरार व्हायचा. त्याचे लक्ष्य बहुतेकदा पर्यटक मुली होत्या. तो बीचवर फिरायला येणाऱ्या मुलींना आकर्षित करायचा. त्यामुळे त्याला बिकिनी किलर हे नाव पडले.