यवतमाळ: काही दिवसांपूर्वी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Yavatmal Medical College) रॅगिंगची (Ranging In College) एक तक्रार नोंदविण्यात आली होती. ही तक्रार विद्यार्थ्याच्या आईकडून नोंदविण्यात आली होती. याच संदर्भात यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई (Action Of Suspension) करण्यात आलेली आहे. डॉ अमोल भामभानी यांच्या रॅगिंग प्रकरणी त्याची आई जुही भामभानी यांनी अधिष्ठाताकडे तक्रार दिली होती. यावरून अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील यांनी निलंबनाची कारवाई केलीये. य प्रकरणासंदर्भात नाशिक आरोग्य विद्यापीठाची 5 सदस्यीय टीम सोमवारी यवतमाळमध्ये येणार असून पुढील चौकशी करणार आहे. रॅगिंगमुळे या डॉक्टर विद्यार्थ्याला सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडल्याचा दावाही तक्रारीतून करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपातील यांनी चौकशी समिती नेमली आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाला असलेल्या डॉ.अनमोल प्रदीप भामभानी याचा तृतीय वर्गात असलेल्यांकडून छळ झाल्याची तक्रार त्याची आई जुही भामभानी यांनी अधिष्ठातांकडे केली. या तक्रारीनुसार, डॉ. ओमकार कवितके, डॉ. अनुप शाह, डॉ. साइलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियांका साळुंके, डॉ. पी. बी. अनुषा यांनी डॉ. अनमोल याला त्रास दिला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या 5 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये.
दोन दिवस सतत उभे ठेवले गेले. कामाने थकल्यानंतरही बसण्यासाठी खुर्ची दिली जात नव्हती. सतत उभे राहिल्याने पायाला वेदना होऊ लागल्या. या सगळ्यामुळे डॉ.अनमोल याला सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडला. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असतानाही डॉ. अनमोल याला घरी पाठविण्यात आले. नंतर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉ. ओमकार हा आपल्या मुलाला खासगी नोकराप्रमाणे वागवित होता, असा आरोपही जुही भामभानी यांनी केला आहे. रॅगिंग करणाऱ्या वरिष्ठ विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी तक्रारीतून केली आहे.