Crime : आधी डोळ्यात मिरची फेकली, नंतर चाकूने केले अनेक वार, तरुणाचा जागीच मृत्यू

| Updated on: Oct 13, 2021 | 8:05 PM

आकाश असे मयत तरुणाचे नाव सांगितले जात आहे. जुन्या शत्रुत्वामुळे ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सांगितले जात आहे की तो तरुण पत्नीला सोडून परत येत होता. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बदमाशांनी संधी दिसताच त्याच्यावर हल्ला केला.

Crime : आधी डोळ्यात मिरची फेकली, नंतर चाकूने केले अनेक वार, तरुणाचा जागीच मृत्यू
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
Follow us on

इंदौर : मध्य प्रदेशात गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इंदूरमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जेथे बदमाशांनी एका तरुणाची चाकूने हत्या केली आहे. घटना जिल्ह्यातील बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. प्रथम बदमाशांनी मयत तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, जेव्हा तरुणाला दिसायचे बंद झाले तेव्हा त्यांनी त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. यामुळे त्याचा मृत्यू झाला. (Young man stabbed to death in Madhya Pradesh)

आकाश असे मयत तरुणाचे नाव सांगितले जात आहे. जुन्या शत्रुत्वामुळे ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सांगितले जात आहे की तो तरुण पत्नीला सोडून परत येत होता. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बदमाशांनी संधी दिसताच त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, गुन्हेगारांनी आधी तरुणांचा माग काढला आणि नंतर ही घटना घडवली.

केरळमध्ये खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या

पत्नीला सर्पदंश करुन तिची हत्या केल्याप्रकरणी केरळातील पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हुंड्यासाठी 25 वर्षीय पत्नी उत्तराचा छळ करुन हत्या केल्याप्रकरणी सुरज दोषी आढळला होता. कोल्लमच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत शिक्षेची सुनावणी केली. बचाव पक्षाने सुरजला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र सुरजला जन्मठेपेची शिक्षा सुरु करण्यापूर्वी दोन आरोपांखाली सलग 10 वर्षे आणि 7 वर्षे शिक्षा भोगावी लागेल. त्याला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पत्नी उत्तरा कोल्लमपासून 40 किमी अंतरावर तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना त्याला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना 7 मे 2020 रोजी घडली होती. त्यावेळी सुरज-उत्तराच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि त्यांना एक वर्षाचे मूलही आहे.

फिर्यादींनी उत्तराचा पती सुरज एस कुमारवर आरोप केला आहे की त्याने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन नागाने चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की गेल्या वर्षी 2 मार्च रोजीही सुरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता. (Young man stabbed to death in Madhya Pradesh)

इतर बातम्या

घरफोडीनंतर निराशा, उपजिल्हाधिकाऱ्यांना चिठ्ठीतून जाब विचारणारा 24 वर्षांचा चोर सापडला

व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने नाशिकमध्ये महिलेचा मृत्यू