गप्पा मारता मारता प्रेमात पडली… बॉयफ्रेंडच्या बापालाच घेऊन पसार झाली; पकडल्यावर म्हणते, त्यांच्या…

| Updated on: Apr 26, 2023 | 2:04 PM

उत्तर प्रदेशात एक विचित्र प्रकार घडला आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या बापाशीच प्रेम करून त्याच्याशी संसार थाटला आहे. तब्बल वर्षभरानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलं.

गप्पा मारता मारता प्रेमात पडली... बॉयफ्रेंडच्या बापालाच घेऊन पसार झाली; पकडल्यावर म्हणते, त्यांच्या...
girlfriend
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक अजब किस्सा घडला आहे. एका तरुणाच्या प्रेमिकेचा त्याच्या बापावर जीव जडला. त्यानंतर संधी साधून दोघेही घरातून पळून गेले. मुलीच्या घरच्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. एक वर्षानंतर पोलिसांनी या दोघांना दिल्लीत अटक केली. यावेळी पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. पण पोलीस काहीच करू शकले नाही. कारण मुलगी सज्ञान होती. पोलीस म्हणाले, तिच्या जबानीनुसारच आम्ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या चकेरी परिसरात कमलेस हा त्याच्या 20 वर्षाच्या मुलासह आला होता. उत्तर प्रदेशातील औरेया येथून कामासाठी आले होते. कमलेशचा मुलगा घर बांधायचं काम करत होता. या दरम्यान येथे राहणाऱ्या 20 वर्षीय मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. ही तरुणी कधी कधी त्याला भेटायला त्याच्या घरी यायची. जेव्हा बॉयफ्रेंड घरी नसायचा तेव्हा ती बॉयफ्रेंडच्या वडिलांशी म्हणजे कमलेशशी गप्पा मारायची.

हे सुद्धा वाचा

गप्पा वाढल्या अन्

पुढे गप्पांचं रुपांतर प्रेमात झालं. ही तरुणी कमलेशच्या प्रेमात पडली. याची कुणकुण तिच्या बॉयफ्रेंडला नव्हती. त्यानंतर या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मार्च 2022मध्ये दोघे घरातून फरार झाले. कमलेशचा मुलगा घरीच होता. त्यामुळे मुलीच्या घरच्यांचा त्याच्यावर संशय गेला नाही. पण मुलीच्या घरतच्यांनी चकेरी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांचा कसून शोध घेतला. पण शोध काही लागत नव्हता.

भेटीगाठी वाढल्या

ही तरुणी कमलेशला भेटायला यायची याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर कमलेशच्या मुलाची चौकशी करण्यात आली. त्यानेही माझ्या प्रेयसीला वडिलांनीच पळवून नेल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही दोघांचाही तपास सुरू केला. या चौकशीत कमलेश मुलीसह दिल्लीत राहत असून तो एका फॅक्ट्रीत काम करत असल्याचं समजलं. त्यानंतर आम्ही दिल्लीत गेलो आणि दोघांना ताब्यात घेतलं. असं पोलीस निरीक्षक रत्नेश सिंह यांनी सांगितलं.

वैद्यकीय चाचणी होणार

आपल्या वडिलांच्या या कारनाम्याविषयी मुलाला माहिती होती. मात्र, लाजेस्तव त्याने कुणाला काहीच सांगितलं नाही. पोलिसांनी कमलेशला अटक केली आहे. या तरुणीची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर दोघांची साक्ष नोंदवली जाणार आहे. मुलाच्या जबानीनंतर पुढील कारवाई होईल. कमलेश सोबतच राहायचं असल्याचं ही मुलगी म्हणत आहे. कमलेश आणि मुलगी दोन्ही सज्ञान आहेत. त्यामुळे त्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.