चंदिगढ : युवा अकाली दलाचा नेता विक्रमजीत सिंह उर्फ विक्की मिद्दूखेरा (Vicky Middukhera) याची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली. कारमधून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी 7 ऑगस्ट रोजी पंजाबच्या मोहालीमधील मटोर येथे विक्कीची हत्या केली होती. बम्बिहा गँगने ही हत्या घडवून आणल्याचा संशय आहे. त्यानंतर प्रतिस्पर्धी लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गँगस्टर संपत नेहरा (Sampat Nehra) याने ‘तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे’ अशी केलेली फेसबुक पोस्ट खळबळ उडवून देत आहे.
विक्की मिद्दूखेराची हत्या
विक्की मिद्दूखेराच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. विक्की शनिवारी सकाळी प्रॉपर्टी सल्लागाराकडे गेला होता. यावेळी चौघा हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. विक्कीने तिथून पळ काढला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करुन हत्या केली. विक्कीच्या शरीरात बंदुकीच्या नऊ गोळ्या सापडल्या आहेत. राजकीय वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.
पाहा व्हिडीओ :
Its a very shocking to see someone in this situation, he tried his best to defend himself, law and order situation during the Independece day month when security and police vigilance is at its peak..
May his soul #RIP#VickyMiddukhera pic.twitter.com/1Mq7tdDdp9— Gurinder Cheema (@GurinderCheema1) August 7, 2021
बम्बिहा गँगवर हत्येचा संशय
दरम्यान, बम्बिहा गँगच्या गौरव पतियाल उर्फ लक्कीने ही हत्या घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पतियाल सध्या अर्मेनियामध्ये आहे. विक्की मिद्दूखेरा हा बिष्णोई गँगचा निकटवर्तीय असल्याचा पतियालचा समज होता. बिष्णोई गँगने बम्बिहा गँगचे दोन साथीदार गुरलाल भलवान आणि राणा सिद्धू यांची हत्या केल्याचा आरोपही केला जात आहे. मिद्दूखेराने दिलेल्या माहितीवरुन या दोघांची हत्या झाल्याचा बम्बिहा गँगचा दावा आहे. बिष्णोई गँगला खंडणी वसुलीसाठी पंजाबी गायक आणि व्यावसायिकांचे फोन नंबर मिद्दूखेरा पुरवायचा, असाही बम्बिहा गँगचा आरोप आहे.
संपत नेहराचा इशारा
दुसरीकडे, बिष्णोई टोळीचा गँगस्टर संपत नेहरा याने शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. विक्की मिद्दुखेराचा बिष्णोई गँगसोबतचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ‘तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे, वेट अँड वॉच’ असं यात लिहिलं आहे. विक्की मिद्दूखेरा, जय भालकारी असे हॅशटॅग देत काला जठेडीसह काही गँगस्टरना या पोस्टमध्ये टॅग करण्यात आलं आहे.
पाहा फेसबुक पोस्ट
संबंधित बातम्या :
मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई