वेल्लोर : माणसामध्ये वासनेचा सैतान घुसला की, त्याला कशाचही भान राहत नाही. फक्त वासना शमवण हेच त्याच लक्ष्य असतं. समाजात स्त्रियांच, अशा विकृतांपासून रक्षण करण्यासाठी अनेक कायदे कठोर बनवलेत. पोलिसांची संख्या वाढवलीय. पण, तरीही महिलांविरोधात गुन्हे घडत असतात. त्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही.
असाच एक धक्कादायक गुन्हा समोर आलाय. एका वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. पीडित महिला ज्येष्ठ नागरिक आहे. या प्रकरणातील आरोपीच वय फक्त 20 वर्ष आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
घराचा दरवाजा उघडा राहिला
पीडित महिला अविवाहित असून ती घरात एकटी राहते. शनिवारी रात्री महिलेच्या घराचा दरवाजा उघडा राहिला. ती झोपून गेली. हीच संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केला.
पोलिसांनी काय कारवाई केली?
आरोपीने घरात घुसून वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आरडाओरडा करताच आरोपी तिथून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं व रविवारी त्याला अटक केली.