मुंबई : नुकताच एक हैराण करणारा प्रकार घडलाय. सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार हा उघडकीस आलाय. हैराण करणारे म्हणजे तब्बल 20 लाखांची फसवणूक करण्यात आलीये. आता या प्रकरणात गुन्हा हा दाखल करण्यात आलाय. तरुणाने थेट पोलिसात धाव घेतलीये. मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैन्य दल आणि पोलिस दलात नोकरीचे आमिष या तरुणांना दाखवत त्याची फसवणूक करण्यात आली.
या तरुणांना कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता सैन्य दलात आणि पोलिस दलात नोकरी लावण्याचे आमिष हे देण्यात आले. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केलीये. या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जातंय. अजूनही काही तरुण या अमिषाला बळी पडले असल्याची देखील चर्चा आहे.
याप्रकरणी तरुणांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पनवेल परिसरात राहणाऱ्या साईश डिंगणकर (वय 25) याला सैन्यात दलात नोकरी करण्याची इच्छा होती. ही बाब त्याने एका मित्राला सांगितली. मित्राने याबाबत चंद्र सेनापती या इसमासोबत त्याची ओळख करून दिली होती.
चंद्र सेनापतीने आपली सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने कुठलीही परीक्षा न देता, सैन्य दलात नोकरी मिळवून देण्याचे आमिष साईशला दिले. त्यासाठी काही खर्च करावा लागेल असेही त्याने साईशला सांगितले. साईश देखील त्याच्या बोलण्यात आला आणि त्याने लगेचच यासाठी होकार देखील दिला.
त्यानुसार 2021 मध्ये साईशने आरोपीला १ लाख रुपये दिले. ही बाब त्याने अन्य मित्रांना देखील सांगितली. त्यांनीही सेनापतीची भेट घेऊन त्याला 2 ते 3 लाख रुपये दिले. असे करून चंद्र सनापती याला तब्बल 20 लाख रूपये देण्यात आले. हे सर्व प्रकरण 2021 पासून सुरू होते. आता याबद्दलचा गुन्हा हा दाखल करण्यात आलाय.