Education: दहावी, बारावी परीक्षा पद्धती बदलणं गरजेचं? केंद्रीय शिक्षण मंडळाने मागविली नागरिकांची मतं! सर्वेक्षणात सहभागी व्हा

| Updated on: Jul 07, 2022 | 7:45 AM

10th 12th Board: या परीक्षा चांगल्या आहेत का, यात किरकोळ बदल आवश्यक आहे का, या परीक्षा विद्यार्थ्यांमधील वास्तविक क्षमतेची परीक्षा घेत नाहीत असे वाटते का असे विविध पर्याय या प्रश्नासमोर ठेवण्यात आले आहेत.

Education: दहावी, बारावी परीक्षा पद्धती बदलणं गरजेचं? केंद्रीय शिक्षण मंडळाने मागविली नागरिकांची मतं! सर्वेक्षणात सहभागी व्हा
joSAA counselling important dates
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रीय अभ्यासक्रम रचना निर्मितीसाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून माहिती आणि सूचना, मते मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी https://ncfsurvey.ncert.gov.in/# या वेबसाईटवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्व्हेमध्ये (Survey) 10 प्रश्न विचारण्यात आले असून शालेय शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अधिक सुसंगत, प्रभावी आणि अर्थपूर्ण होण्यासाठी सहज व स्पष्ट सूचनादेखील मागविण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणात दहावी, बारावी मंडळ परीक्षांबद्दल (10th 12th Board Exams) काय वाटते, अशी विचारणा करण्यात आली आहे. बोर्ड परीक्षा (Board Exams)पद्धती बदलायला हव्यात का, या परीक्षा चांगल्या आहेत का, यात किरकोळ बदल आवश्यक आहे का, या परीक्षा विद्यार्थ्यांमधील वास्तविक क्षमतेची परीक्षा घेत नाहीत असे वाटते का असे विविध पर्याय या प्रश्नासमोर ठेवण्यात आले आहेत.

तज्ज्ञांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडून मत मागविले

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक सर्वेक्षण सुरू केले असून देशभरातील नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन केले आहे. दहावी, बारावी बोर्ड परीक्षांसह शाळा, अभ्यासक्रम अशा विविध प्रश्नांवर विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडून मत मागविले आहे. देशातील नागरिक दोन हजार शब्दांत आपल्या सूचना मांडू शकतात. हा सर्व्हे देशातील 23 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असून जास्तीत जास्त नागरिकांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी सूचना द्याव्यात, असे आवाहन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) केले आहे.

ही स्पर्धा संपविण्यासाठी नागरिक बोर्ड परीक्षांबाबत आपले मत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सरकारला कळवू शकतात. याशिवाय विद्यार्थी सर्वाधिक ताण कशाचा घेतात? शालेय-बोर्ड परीक्षा, गृहपाठ की शाळेतील उपस्थितीचा, असा प्रश्नही सर्व्हेमध्ये विचारण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वेक्षणात विचारण्यात आलेले दहा प्रश्न

  • समाज-शाळा यांच्यात सहभाग वाढविण्यासाठी चांगले मार्ग कोणते?
  • कोरोनात शाळा बंद झाल्यामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी चांगले मार्ग काय आहेत?
  • पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशी संबंधित प्राथमिक मुद्दे कोणते जे नवीन रचनेत उपयोगी पडतील?
  • विद्यार्थ्यांमध्ये तणाव दिसण्याची कारणे कोणती?
  • वर्ग दहावी, बारावी मंडळ परीक्षांबद्दल मत काय?
  • शालेय शिक्षणाने विद्यार्थ्यांना काय मिळावे?
  • शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी काय करायला हवे?
  • वर्गात शिकविणे आनंददायी कसे बनेल?
  • पालक मुलांच्या प्रगतीत कसे सहभागी होऊ शकतील?
  • नवीन शैक्षणिक धोरणात पर्यावरणविषयक अभ्यासाचा समावेश करायला हवा का?