फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करीअरच्या दृष्टीने दहावी आणि बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला आकार देण्याच्या दृष्टीने ही दोन वर्ष अत्यंत महत्त्वाची मानली जातात. महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा दिली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांच लक्ष निकालाकडे लागलं आहे. निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालक वर्गाचे डोळे लागले आहेत. याच निकाला संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर होतील. आधी बारावीचा निकाल त्यानंतर दहावीचा निकाल जाहिर होऊ शकतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यर्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.
राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता.यंदा एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली. 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली. दुसरीकडे 5 हजार 86 केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने बऱ्याच उपायोजना केल्या होत्या. भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
कधी लागणार निकाल?
निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तारीख जाहीर होणार आहे. पुढच्या आठवड्यात बोर्डाचा निकाल जाहीर होणार. पुढच्या आठवड्यात निकाल जाहीर केले जाणार. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिलीय. दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालकांची पसंतीच्या कॉलेजमध्ये, शाखेमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु होते. आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी टक्केवारी महत्त्वाची ठरते. म्हणून दहावी-बारावीचे विद्यार्थी वर्षभरत कसून मेहनत घेतात.