मुंबई : राज्यामध्ये बारावीचे पेपर सध्या सुरू आहेत. परीक्षेदरम्यान (Exams) कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे असताना देखील मुंबईमध्ये (Mumbai) केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री पेपर होता. राज्यामध्ये इतर ठिकाणी हा पेपर सुरळीत पार पडला. परंतू मुंबईमधील विलेपार्ले परिसरातील साठे कॉलेजमध्ये पेपर फुटीची घटना उघडकीस आली आहे. मात्र, शिक्षण मंत्र्यांनी पेपर फुटल्याचा आरोप खोडून काढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केमिस्ट्रीचा (Chemistry) जो पेपर लिक झाला आहे, तो चक्क एका व्हाट्सअप ग्रुपवर. या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जवळपास 17 विद्यार्थी असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे रॅकेट मोठे असल्याचे देखील बोलले जात आहे.
मुंबईमध्ये केमिस्ट्रीचा पेपर लिक
मालाड परिसरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीचे परीक्षा सेंटर विलेपार्ले येथील साठे आले होते. ही 17 वर्षांची विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी वर्गामध्ये उपस्थित नव्हती. याचदरम्यान परीक्षा सेंटरवर एका सुपरवायझर शिक्षकांला बाथरूममधून आवाज आला. या शिक्षकांने चेक केले असता त्याला बाथरूममध्ये एक विद्यार्थिनी दिसली. यामुळे शिक्षकाने तिची चाैकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे शिक्षकाच्या मनात शंका निर्माण झाली आणि अधिक चाैकशी केली असता विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्रीच्या पेपर लिक झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले.
खाजगी शिकवणीच्या मालकाला अटक
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच विलेपार्ले पोलिसांनी मालाडच्या एका खाजगी शिकवणीच्या मालकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे. या खाजगी शिकवणीच्या मालकाचे नाव मुकेश धनसिंग यादव आहे आणि यालाच पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थिनींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून चौकशीनंतर त्या मुलींना सोडून देण्यात आल्याचे कळते. विद्यार्थिनीचा मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस सध्या पुढील चाैकशी करत आहेत. या शिकवणी चालकाकडे केमिस्ट्रीचा पेपर कसा आला आणि हा पेपर मिळवण्यासाठी याने किती पैसे मोजले याची संपूर्ण चाैकशी सध्या सुरू आहे.
शनिवार, दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इ. बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. त्यात तथ्य नाहीं. या प्रकरणी आज विधानपरिषदेत मी केलेलं निवेदन. pic.twitter.com/5TnlPxChek
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 14, 2022
पेपर फुटला नसल्याचा शिक्षणमंत्र्यांचा दावा!
मुंबईमधील साठे कॉलेजमध्ये पेपर फुटला नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू असल्याचे शिक्षणमंत्र्याचे म्हणणे आहे. याप्रकरणात शिक्षणमंत्री यांनी विधानपरिषदेमध्ये ही माहिती देत निवेदन दिल आहे.
संबंधित बातम्या :
कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
Bank Jobs : बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती, 48 ते 89 हजारांपर्यंत पगाराची संधी