मुंबई: प्रत्येक तरुण उत्तम पॅकेजसह नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतो. त्यासाठी बहुतेक जण वेगवेगळे डिग्री आणि डिप्लोमा कोर्सही करतात, पण पदवी किंवा डिप्लोमा नंतरच चांगले पैसे कमावता येतील असे नाही, हुशारीने काम केल्यास खूप चांगल्या गोष्टी कमी वेळात करता येतात. उदाहरणार्थ, हल्ली काही सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत, जे करूनही तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. यापैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कोणताही कोर्स निवडू शकता.
या सर्टिफिकेट प्रोग्रामचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर प्रोफेशनल्सही या कोर्सेसच्या आधारे चांगली प्रगती करू शकतात, कारण यामुळे चांगली नोकरी आणि चांगली बढती मिळण्याची शक्यता वाढते. हे आहेत काही ऑनलाइन सर्टिफिकेशन प्रोग्रॅम्स…
जर तुम्हाला आयटी इंडस्ट्रीत चांगली एन्ट्री करायची असेल तर गुगल सर्टिफाइड प्रोफेशनल क्लाऊड आर्किटेक्ट सर्टिफिकेट कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. हा अभ्यासक्रम या आयटी क्षेत्रातील भारतातील सर्वोत्कृष्ट सर्टिफाइड कोर्सपैकी एक आहे. त्याचबरोबर प्रचंड मागणी आणि क्लाऊड जॉब इंजिनीअर्सच्या कमतरतेमुळे तुम्हाला यात लवकर नोकरी मिळू शकते, तीही चांगल्या पॅकेजवर.
जर तुम्ही ग्रॅज्युएट झाला असाल आणि त्यानंतर रोजगाराच्या शोधात असाल तर या कोर्समध्ये प्रवेश घेणं चांगलं. कारण यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये चांगले करिअर करू शकता.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्टिफिकेशन कोर्सच्या माध्यमातून ऑटोमेशन, रोबोटिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम्सबद्दल माहिती मिळू शकते. असे केल्यावर आरोग्य, शिक्षण, बँकिंग, वाहतूक क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होतात.
ग्रॅज्युएशननंतर तुम्ही सायबर सिक्युरिटीचा कोर्स करू शकता. नेटवर्क आणि गोपनीय डेटा चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्वायत्त वैज्ञानिक संस्थेमार्फत हे अभ्यासक्रम चालवले जातात.
वेब डेव्हलपरचे काम वेबसाइट डिझाइन करणे आहे. आजकाल लहान-मोठा कोणताही व्यवसाय स्वत:च्या वेबसाईटशिवाय वाढू शकत नाही. त्यामुळे हा कोर्सदेखील तुम्हाला तितकेच पैसे कमवायला’संधी देऊ शकतो.