IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर या तूफान चर्चेत आहेत. प्रबोशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी त्यांनी केली. लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर यामुळे त्या चर्चेत आल्या. आता पूजा खेडकर यांचे पाय अधिकच खोलात असल्याचे बघायला मिळतंय. IAS पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांकडे 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स, 1 लाख स्केअर फुटाची 6 दुकाने आहेत. स्वत: पूजा खेडकर यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती आहे. तर पूजाचे वडिलांनी निवडणूक शपथपत्रात 40 कोटींची संपत्ती दाखवली होती.
दुसरीकडे पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलेअर ओबीसींमधून काढले होते. त्यामध्ये त्यांनी वर्षाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षाही कमी दाखवले. पूजा खेडकरला ऑल इंडिया 841 रैंक मिळाले. या रँकवर आयएसएस कॅडर उपलब्ध नसले तरी पूजा खेडकर यांना आयएएस कॅडर मिळाले आहे. यामुळेच आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
पूजा खेडकर याने यूपीएससी परीक्षेदरम्यान दावा केला होता की, त्या नॉनक्रिमी लेयर ओबीसी आहेत. याशिवाय पूजा खेडकरने ती दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावाही केला होता. पूजाने यूपीएससीकडे प्रमाणपत्रही जमा केले होते. यूपीएससीने पूजाचे मेडिकल करवून घेण्याबाबत बोलले तेव्हा पूजाने कोरोनाचे कारण देत वैद्यकीय तपासणीस नकार दिला.
आता या प्रकरणात खेडकर कुटुंबियांच्या समस्या या चांगल्याच वाढल्याचे बघायला मिळतंय. या प्रकरणात आता याची चौकशी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केली जात असून दोन आठवड्यांत अहवाल सादर करावा लागेल. अहवालात पूजावरील हे आरोप खरे ठरले तर तिच्यावर मोठी कारवाई केली जाईल.
पूजा खेडकर यांच्यावर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 318 (4), कलम 336 (3) आणि कलम 340 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ही कलमे फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि बनावट कागदपत्रे यांच्याशी संबंधित आहेत. ज्यामध्ये पूजा या दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. नोकरी तर जाणारच . आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने होते, त्यामुळे पूजाला केवळ राष्ट्रपतीच बडतर्फ करू शकतात.