गरीबांच्या पोरांची गगन भरारी… बेकरी कामगाराच्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींची नीट परीक्षेत उत्तुंग कामगिरी

| Updated on: Jun 06, 2024 | 6:03 PM

नीट परीक्षेचा निकाल लागलाय. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घणघणीत यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे बेकरी कामगाराच्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींनी मोठे यश मिळवले आहे. आता या मुलींवर काैतुकाचा वर्षाव होताना देखील दिसतोय. राज्यातून यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिलीये.

गरीबांच्या पोरांची गगन भरारी... बेकरी कामगाराच्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींची नीट परीक्षेत उत्तुंग कामगिरी
NEET exam
Follow us on

नीट परीक्षेचा निकाल लागलाय. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. असे म्हणतात ना जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळू शकता. याचे उत्तम उदाहरण या नीट परीक्षेत बघायला मिळाले. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेत सोलापुरातल्या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अल्फीया पठाण या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केलंय. आता अल्फीया पठाणचे काैतुक केले जातंय. अल्फीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे यासाठी तिने कोणतेही क्लासेस किंवा ट्युशन न लावता सेल्फ स्टडी करत यश संपादित केले, हे अत्यंत विशेष आहे.

अल्फीयाचे वडील मुस्तफा पठाण हे भाजी विक्रीचे काम करतात आणि आई समिना कपड्याच्या दुकानात कामाला जातात. दोघेही अल्प शिक्षित असूनही आपली मुलगी डॉक्टर व्हावी म्हणून दोघांनीही कठोर परिश्रम घेतले. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना अल्फीयाने मिळवलेल्या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

दुसरीकडे मुंबईतील जोगेश्वरी परिसरात अमिना आरिफ ही राहते. आमिनाचे वडील हे बेकरी कामगार आहेत. अमिना आरिफ हिने देखील नीट परीक्षेत घणघणीत यश मिळवले आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे अमिना आरिफ हिने नीट परीक्षेत 720 पैकी पूर्ण 720 गुण मिळवले आहेत. लोक तोंडभरून अमिना आरिफ हिचे काैतुक करताना दिसत आहेत.

अमिना आरिफ म्हणाली की, नीट परीक्षेला बसण्याचा माझा कोणत्याही विचार नव्हता. मी लॉकडाऊनच्या काळात परीक्षा दिली. मात्र, त्यावेळी मला चांगले मार्क मिळाले नाहीत. त्यानंतर मी माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले आणि खासगी शिकवणी लावली. मेहनत घेऊन हे यश मी संपादन केले. अमिना आरिफचे शिक्षण मुंबईतच झाले.

अमिना आरिफचे हायस्कूलचे शिक्षण विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयातून झाले. विशेष म्हणजे 95 टक्के गुणांसह ती बारावी उत्तीर्ण झाली. अमिना आरिफने तिच्या यशाचे खास गुपित देखील शेअर केले आहे. अमिना आरिफ म्हणाली की, दर आठवड्यातून दोन सराव सेट ती सोडवत होती. यंदाही राज्यातून नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.