नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजेन्सीद्वारे (National Testing Agency)घेतली जाणारी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टची (CUET) अर्ज प्रक्रिया संपत आलीये. या परीक्षेसाठी अर्ज भरायची शेवटची तारीख (Last Date) 6 मे 2022 आहे. अर्ज भरण्यासाठी काहीच दिवस बाकी असून सुद्धा एनटीए कडून अजूनही परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अर्ज प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर CUET च्या परीक्षेची तारीख जाहीर होऊ शकते अशी शक्यता वर्तविली जातीये. पदवीपूर्व प्रवेशाच्या सीयूईटी परीक्षेसाठी 2 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये. सीयूईटी 2022 ची प्रवेश परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेसंदर्भातली माहिती लवकरच एनटीए कडून प्रसिद्ध केली जाईल. CUET परीक्षेच्या तारखेसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देत रहावी. एनटीए ने परीक्षाच पॅटर्न सुद्धा जारी केलेला आहे जो विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. मार्किंग सिस्टम कशी असणार आहे यासंदर्भातली माहिती देखील वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
CUET च्या अधिकृत वेबसाईटवर cuet.samarth.ac.in जा
होम पेजवर न्यू रजिस्ट्रेशन येईल तिथे क्लिक करा
सगळी माहिती भरून रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरा
जी कागदपत्रं अपलोड करायला सांगितली आहेत ती अपलोड करा
फॉर्म फी भरा ( असेल तर )
फॉर्म सबमिट करा
फॉर्मची प्रिंट आऊट जवळ ठेवा
कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 पासून दोनदा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकले नाहीत त्यांच्याकडे चांगले गुण मिळवायची अजून एक संधी उपलब्ध असणार आहे. पुढच्या वर्षापासून या दोन्ही परीक्षा बारावीच्या परीक्षेनंतर 45 दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील. जे विद्यार्थी पहिल्या संधीत चांगला स्कोअर करू शकले नाहीत ते दुसऱ्या ते दुसऱ्यांदा परीक्षा देऊन स्कोअर करू शकतात. सीयूईटी परीक्षा बारावीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
इतर बातम्या :