गुवाहटी: आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात सोमवारी एक दुर्घटना घडली. करीमगंज जिल्ह्यातील राताबारी विधानसभा क्षेत्रात नदीवरील लटकता पूल तुटल्यानं 30 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. शाळेतून घरी जाताना विद्यार्थी नदीवरील पूल पार करत असताना पूल तुटला आणि विद्यार्थी नदीत कोसळले. करीमगंज जिल्ह्यातील राताबारी येथील चेरागी इथं ही घटना घडली.
नदीवर लटकता पूल तुटला त्यावेळी विद्यार्थी घरी परत जात होते. आसाममधील सिंगला नदीवर बांधण्यात आलेला लटकता पूल चेरागी आणि राताबारीतील इतर भागांना जोडणारा एकमेव पूल होता. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी आणि इतर नागरीक या पुलांचा वापर करत होते.
सोमवारी चेरागी विद्यापीठ हायस्कूलचे विद्यार्थी पुलावरुन सिंगला नदी पार करत होते. यावेळी नेमका पूल तुटला आणि नदीत कोसळला. यामुळे नदी पार करणारे 30 विद्यार्थी नदीत कोसळले आणि जखमी झाले. ही घटना घडली त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्कता दाखवत विद्यार्थ्यांना वाचवलं. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याात आलं आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली होती.
आसामची राजधानी गुवाहटीमध्ये पांडू घाट परिसरात ब्रह्मपुत्रा नदीत बुडाल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. हे विद्यार्थी ट्युशनवरुन परतत होते. यावेळी त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी नदीत उड्या मारल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघे विद्यार्थी 14 ते 15 वर्ष वयोगटातील होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुत्रा नदीतून त्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी नदीत उड्या मारण्यापूर्वी त्यांनी घाटावर फोटो सेशन केलं होतं. मोबाईल फोनवरुन त्यांनी काही व्हिडीओ देखील शुट केले होते. नदी किनारी त्यांचं साहित्य आढळून आलं होतं.
इतर बातम्या:
देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल; राहुल गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
Assam Karimganj 30 students injured due to Hanging bridge collapses in river