इंजिनिअरिंग ही अशी पदवी आहे जी आपल्या सगळ्यांनाच आज माहित आहे. मधल्या काळात या पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. इंजिनिअरिंगच्या पदवीला बीई म्हणतात. बीई म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. यात अजून एक प्रकार असतो बी.टेक! विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बीई किंवा बीटेकमध्ये प्रवेश घ्यायचा की नाही याबाबत अनेकदा संभ्रम असतो. बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (बी.ई.) आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) हे दोन्ही इंजिनीअरिंग शिकवत असले तरी दोघांमध्ये बराच फरक आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन पदवी अभ्यासक्रमांमध्ये काय फरक आहे हे सांगत आहोत.
अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या विद्यापीठे किंवा संस्थांकडून अभियांत्रिकी करून मिळवलेली बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग पदवी म्हणजेच बी.ई. तर, अशी विद्यापीठे किंवा संस्था जे केवळ अभियांत्रिकी पदवी देतात, ती पदवी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बीटेक (B.Tech) ची असते. बीटेकच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत बीईच्या विद्यार्थ्यांना गणित मोठ्या प्रमाणात शिकवले जाते.
बी.ई. आणि B.Tech पदवी देणाऱ्या काही नामांकित संस्थांमध्ये बिट्स पिलानी, अण्णा विद्यापीठ इत्यादींचा समावेश आहे. तर आयआयटी, एनआयटी, डीटीयू आदी नामांकित अभियांत्रिकी संस्था B.Tech पदवी देतात.
बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगच्या पदवीमध्ये थिअरी आणि फंडामेंटल्सवर जास्त भर दिला जातो आणि मजबूत फंडामेंटल्सवर लक्ष केंद्रित केले जाते. बीई ची पदवी नॉलेज ओरिएंटेड आहे. त्याचा अभ्यासक्रम नेहमीच अद्ययावत म्हणजे अपडेटेड नसतो.
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या B.Tech डिग्रीमध्ये प्रॅक्टिकल्सकडे अधिक लक्ष दिले जाते. औद्योगिकाभिमुख असल्याने या पदवीतील अभ्यासक्रम वेळोवेळी अपडेट केला जातो.
ही पदवी मिळाल्यानंतर इंटर्नशिप प्रोग्राम आणि इंडस्ट्रियल सर्व्हे करणे आवश्यक आहे. B.Tech लोकांना नोकरीत लवकर निवड मिळते. त्याचबरोबर बाजारातील मागणीची गरज लक्षात घेऊन बीटेकचे विद्यार्थी तयार असतात.