Marathi News Education Baya Baya, what is the 'Mumbai Public School'! Parents and children eager, more than 11 thousand 500 new admissions in 5 days
बया काय तो थाट ‘मुंबई पब्लिक स्कूल’चा ! लई डिमांड ! 5 दिवसांत तब्बल 11 हजार 500 पेक्षा अधिक नवीन प्रवेश
या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. दिनांक 18 एप्रिल 2022 पासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यापासून आज अवघ्या 5 दिवसात तब्बल 11 हजार 549 नवीन प्रवेश निश्चित झाले आहेत.
राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नावीण्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चौफेर प्रगतीची संधी देणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे.
1 / 7
अद्ययावत आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधांमुळे देशभरात नावाजलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अर्थात मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून यंदा 1 लाख नवीन प्रवेश करण्याचे ध्येय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यासाठी मिशन ॲडमिशन एकच लक्ष्य – एक लक्ष ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
2 / 7
या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. दिनांक 18 एप्रिल 2022 पासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यापासून आज अवघ्या 5 दिवसात तब्बल 11 हजार 549 नवीन प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नावीण्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चौफेर प्रगतीची संधी देणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे.
3 / 7
शाळांच्या इमारती, अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम या सर्वच बाबींमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून महानगरपालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ लागली आहे.
4 / 7
प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने यंदा मिशन ॲडमिशन एकच लक्ष्य –एक लक्ष या मोहीम अंतर्गत किमान 1 लाख नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी, सर्व शाळांचा सामाजिक दर्जा एकसमान गुणवत्तापूर्ण रहावा, याकरिता सर्व शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जात आहेत.
5 / 7
बालवाडी (नर्सरी) ते दहावीपर्यंत निःशुल्क शिक्षण देणाऱया महानगरपालिका शाळांमध्ये अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात.एकूण 8 भाषांमधून शिक्षण देणारी व स्वतंत्र संगीत, कला, कार्यानुभव, स्काऊट- गाईड विभाग असणारी ही देशातील एकमेव महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबईची ओळख आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱया सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
6 / 7
महानगरपालिका माध्यमिक शाळेतून शिक्षण घेऊन माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वप्रथम येणाऱया 25 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी किमान रुपये 25,000 किंवा ते शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमाचो शैक्षणिक शुल्क अर्थसहाय्य म्हणून देण्यात येत आहे. सद्यस्थितीत 50 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच माध्यमिक शालांत (एस.एस.सी. बोर्ड) परीक्षेत 90 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांला रोख रुपये ५,०००/- चे पारितोषिक देऊन गौरविण्यात येत आहे.
7 / 7
महानगरपालिकेच्या शालेय इमारती आता अद्ययावत, सुसज्ज आणि आकर्षक अशा करण्यात आल्या आहेत. शाळांची स्वच्छता व सुरक्षा नियमितपणे होण्यासाठी हाऊसकिपिंग सेवा घेण्यात आली आहे. शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण दिले जाते. दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वर्गखोल्या (क्लासरूम) डिजिटल होत आहेत.