MHT-CET : पोरांनो रजिस्ट्रेशनची तारीख लक्षात ठेवा ! सीईटीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ

| Updated on: May 06, 2022 | 11:37 AM

एमएचटी-सीईटी, एमबीए, एमसीए, पदव्युत्तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर एमएचसीटी या परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्याबाबतच विद्यार्थी आणि पालकांकडून मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली.

MHT-CET : पोरांनो रजिस्ट्रेशनची तारीख लक्षात ठेवा ! सीईटीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ
MHT-CET : पोरांनो रजिस्ट्रेशनची तारीख लक्षात ठेवा !
Image Credit source: eastcoastdaily
Follow us on

मुंबई : MHT-CET परीक्षेच्या (CET Exams) रजिस्ट्रेशनची तारीख (Registration Dates) पुढे ढकलण्यात आलीये. विद्यार्थी 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत MHT-CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी (Online Registration) मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 11 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सीईटी सेलतर्फे घेतली जाते. एमएचटी-सीईटी, एमबीए, एमसीए, पदव्युत्तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर एमएचसीटी या परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्याबाबतच विद्यार्थी आणि पालकांकडून मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली. विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार. MHT-CET, MBA/MMS, MCA, M-ARC and M-HMCT या सीईटी परीक्षांसाठी उमेदवार 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात.

MHT-CET सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. इतर परीक्षांच्या वेळीच जर एमएचटी सीईटी असेल तर विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी ट्विटरवर एमएचटी सीईटी परीक्षांची तारीख पुढे ढकलल्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली होती. इतर परीक्षांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. या परीक्षेच्या तारखांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक अशा नावाने या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.

 

हे सुद्धा वाचा