भाजीविक्रेत्या महिलेने परिस्थितीवर मात करून लेकाला केले सीए ‘तो’ व्हिडीओ…

| Updated on: Jul 15, 2024 | 7:31 PM

सीएची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मुलाचे नाव योगेश ठोंबर असून त्याची आई एक भाजी विक्रेता आहे. निरा ठोंबरे या कल्याणजवळच्या खोणी गावात राहतात. विशेष म्हणजे त्यांनी पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि चक्क लेकाला सीए बनवले. लाेक योगेश याचे काैतुक करताना दिसत आहेत.

भाजीविक्रेत्या महिलेने परिस्थितीवर मात करून लेकाला केले सीए तो व्हिडीओ...
ca exam
Follow us on

असे म्हणतात ना जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विशेष म्हणजे परिस्थिती काहीही असो शेवटी जिद्द म्हणत्वाची असते. असा एक अनुभव कल्याणमध्ये आलाय. भाजी विक्री करणाऱ्या महिलेच्या लेकाने जिद्दीवर थेट देशातील अवघड समजली जाणारी सीएची परीक्षा पास केलीये. लेकाच्या यशानंतर भाजी विक्री करणाऱ्या निरा ठोंबरे यांच्या डोळ्यांतून आनंद अश्रू आले. अत्यंत कष्टाने निरा ठोंबरे यांनी आपल्या लेकाला शिकवले आणि थेट सीए बनवले.

सीएची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मुलाचे नाव योगेश ठोंबर असून त्याची आई एक भाजी विक्रेता आहे. निरा ठोंबरे या कल्याणजवळच्या खोणी गावात राहतात. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. विशेष म्हणजे तीन मुलांचे संगोपन त्यांनी केले.

निरा ठोंबरे यांनी कधीच परिस्थितीसमोर हार मानली नाही. भल्या पहाटे सकाळी उठून त्या भाजीपाला आणण्यासाठी जात आणि दिवसभर डोंबिवलीच्या गांधीनगरमध्ये भाजी विक्री करत. विशेष म्हणजे त्यांना परिस्थितीसमोर हार मानायची नसल्याने त्यांनी एकही दिवस कंटाळा केला नाही.

ऊन असो किंवा पाऊस निरा ठोंबरे यांनी भाजीविक्री केली. यादरम्यानच्या काळात त्यांनी एका मुलाचे आणि मुलीचे लग्नही केले. योगेश हा शाळेपासूनच अभ्यासात हुशार असल्याने त्याने सीएची परीक्षा झटक्यात पास केली. हेच नाहीतर तो आपल्या आईला कायमच सांगायचा की, तू माझा काळजी अजिबातच करू नकोस.

सीए झाल्यानंतर योगेश हा आपल्या आईला भेटायला आला आणि त्यानंतर भाजी विक्री करत असलेली आई त्याचा गळ्याला पडून रडताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.