आता नुकतेच 10 वी व 12 वी चे निकाल जाहीर होताना दिसत आहेत. पालक आणि विद्यार्थी करिअरची निवड करताना संभ्रमात असल्याचे आपणास दिसून येत आहे. पालक व विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर व्हावा व त्यांना एक नवीन माहिती मिळणं आवश्यक आहे. कष्टाला कमी वयाची साथ असेल तर यशाची उभारी लवकर मिळते. विद्यार्थ्यांनी त्यासाठी दहावीपासूनच तयारी करणं गरजेचं आहे. दहावी उत्तीर्ण पात्रतेवर स्टाफ सिलेक्शन कमिशनमद्वारे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल भरती आयोजित केली जाते. त्याची माहिती आजच्या लेखातून घेणार आहोत.
सध्याच्या कोविड महामारी परिस्थितीमध्ये भारतावर नव्हेतर संपूर्ण जगावर रोजगाराचे संकट आलेले आहे. त्यात सुरक्षित करिअर आपल्याला मिळावे यासाठी युवक धडपड करताना आपणास दिसतात. केंद्र व राज्य सरकारे अंतर्गत विविध सरकारी नोकर्यांसाठी वेगवेगळ्या मंडळ व आयोगाद्वारे परीक्षा घेतल्या जातात. त्यातील काही परीक्षांची माहितीः
1. स्टाफ सिलेक्शन कमिशनः आनंदाची बातमी म्हणजे नुकत्याच स्टॉफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 25271 जनरल ड्यूटीची जाहिरात 2021 परीक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आली. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17/07/2021 ते 31/07/2021 ही आहे.
अ) शैक्षणिक अर्हताः किमान 10 वी पास
ब) वयोमर्यादाः खुला प्रवर्ग- 18 ते 23 वर्षे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती- 5 वर्षे शिथील, इतर मागास प्रवर्ग- 3 वर्षे शिथील, माजी सैनिक – 3 वर्षे शिथील.
क) महिलांसाठी असलेल्या जागाः या जाहिरातीमध्ये महिला उमेदवारांसाठी सुद्धा 2847 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्यांना आपले करिअर देशसेवेसाठी करावयाचे आहे, त्या महिलांना ही एक सुवर्णसंधी आहे.
ड) परीक्षेचा ऑन लाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटः https://SSC.nic.in, www.sscwr.net
इ) परीक्षेचा पॅटर्नः ही परीक्षा 100 गुणांची बहुपर्यायी असून 90 मिनीटे अर्थात दिड तासाची आहे. एका चुकीच्या प्रश्नास 0.25 निगेटीव्ह मार्क्स. पेपरमध्ये एकुण 4 सेक्शन विचारले जातील. 1) बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न, 25 गुण, 2) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी- 25 प्रश्न, 25 गुण, 3) स्पर्धा परीक्षा गणित- 25 प्रश्न, 25 गुण, 4) इंग्रजी किंवा हिंदी- 25 प्रश्न, 25 गुण
फ) ऑनलाईन परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पीईटी (शारिरीक चाचणी क्षमता)ः
पुरुषः 5 कि.मी. अंतर 24 मिनीटात पार करणे.
महिलाः 1.6 कि.मी. अंतर 8.30(साडे आठ मिनीटे) मिनीटात पार करणे.
ग) शारिरीक मोजमापः
पुरुषः खुला, अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग- 170 सें.मी.(छाती- न फुगवता 80 सें.मी., फुगवून 85 सें.मी.) अनुसूचित जमाती- 162.5 सें.मी. (छाती- न फुगवता 76 सें.मी., फुगवून 81 सें.मी.)
घ) अंतिम निवडः लेखी व शारिरीक क्षमता चाचणीवर आधारीत राहील. तसेच 10 वी नंतर रेल्वे, ऑर्डनन्स ग्रृप, जिल्हा परिषद, इरिगेशन, पाटबंधारे डिपार्टमेंट व विविध सरकारी खात्यांमध्ये संधी असते. शिक्षण घेता घेता आपण नोकरीचे पर्याय शोधावयास पाहीजे. जेणेकरुन अनुभवातून आपले ठरलेले यश मिळू शकते.
-प्रा.गोपाल दर्जी, संचालक, दर्जी फाऊंडेशन, जळगाव
इतर बातम्या:
Indian Navy MR Recruitment : भारतीय नौदलात 350 नाविकांची भरती, दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी