कॅटची (CAT) तयारी करणारे विद्यार्थी कॅट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. कॅट परीक्षेची नोटीस आयआयएम बंगळुरूने यापूर्वीच जारी केली आहे. iimcat.ac.in आयआयएम कॅटच्या अधिकृत वेबसाइटवर (IIM CAT Official Website) ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अर्ज प्रसिद्ध करण्यात आला आहे. अर्ज प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी सहज अर्ज भरू शकतात. कॅट परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार कॅटची परीक्षा 27 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. माहितीनुसार, कॅट 2022 ची नोंदणी प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली आहे.
कॅट परीक्षा 2022 च्या पॅटर्न आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॅटची परीक्षा 2 तासांसाठी तीन स्लॉटमध्ये होणार आहे. पहिला स्लॉट सकाळी 8:30 ते रात्री 10:30 पर्यंत, दुसरा स्लॉट- सकाळी 12:30 ते दुपारी 2:30 आणि स्लॉटमध्ये आयोजित केला जाईल. तिसरा स्लॉट दुपारी 4:30 ते 6:30 या वेळेत होणार आहे. CAT २०२२ आयआयएम बंगळुरूद्वारे घेण्यात येत आहे. लाखो विद्यार्थी ‘कॅट’ परीक्षेची तयारी करतात आणि यंदाही 2 ते 3 लाख नोंदणी होईल, असा अंदाज आहे.
कॅटचे अर्ज दाखल करण्यास 3 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२२ आहे. एकदा का कॅट 2022 ची नोंदणी बंद झाली की, सादर केलेला अर्ज दुरुस्त करण्यासाठी कॅट करेक्शन विंडो उघडली जाईल. कॅट नोंदणी पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना सर्वसाधारण प्रवर्गासाठी 2200 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 1100 रुपये कॅट अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ‘आयआयएम’तर्फे दरवर्षी सामायिक प्रवेश परीक्षा (कॅट) घेण्यात येते. आयआयएम बंगळुरू जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात कॅट 2022 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.