CBSE 10th 12th Result 2022: सीबीएसई 10th आणि 12th परीक्षेच्या निकालाबाबत मोठी बातमी आहे. सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या निकालाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी संकेत दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Result) 15 जून रोजी संपल्या आहेत, त्यानंतर कॉपी तपासून निकाल तयार करण्यासाठी 45 दिवस लागतील. ते पुढे म्हणाले की, परीक्षेचा निकाल बोर्डाकडून वेळेत जाहीर केला जाईल. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल देण्यास विलंब होणार नाही. दहावी-बारावीचा निकाल (10th 12th Results) बोर्ड वेळेत जाहीर करेल.
शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार या महिन्याअखेरीसच या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार दहावीचा निकाल 26 जुलै आणि बारावीचा निकाल 28 जुलै रोजी लावता येणार आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू झाल्या. दहावीची परीक्षा 24 मे 2022 पर्यंत घेण्यात आली होती. बारावीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत घेण्यात आली होती. यंदा सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती.
Uttar Pradesh | There is no delay in the CBSE result. CBSE exams were going on till June 15. After that, checking takes 45 days. I spoke with CBSE (officials) yesterday only and the results will come on time: Union Education Minister Dharmendra Pradhan, in Kanpur pic.twitter.com/5B83250Qey
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 16, 2022