CBSE Class 10th Result नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. सीबीएसई कडून दहावीच्या निकालासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या सूत्रानुसार विद्यार्थ्यांचे गुण नोंदवण्यात आले आहेत. सीबीएसईच्या एका परिपत्रकानुसार दहावीचा निकाल 15 जुलै 2021 पर्यंत जाहीर होण्याचा अंदाज आहे. सीबीएसई कडून दहावीचा निकाल वेबसाईट वर जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचा निकाल cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वेबसाईटवर सीट नंबर टाकून पाहू शकतात. (CBSE 10th Result 2021 CBSE Class 10 Result will declare before 15 July)
कोरोना विषाणूच्या संकटामुळे सीबीएससी गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील निकालाची अधिकृत तारीख जाहीर करणार नाही.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल 2021 रोजी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दहावीच्या निकालाचं सूत्र 1 मे 2021 रोजी जाहीर करण्यात आलं होतं. त्या सूत्रानुसार दहावीचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होईल.
सीबीएसईंनं तयार केलेल्या 20+80 या फॉर्म्यल्यानुसार दहावीचा निकाल जाहीर होई.ल प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांचे 100 गुणांचा मूल्यांकन केले जाईल. या मधील 20 गुण पहिल्या पद्धतीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनावर दिले जातील. तर 80 गुण नव्या धोरणानुसार दिले जातील. यामध्ये 10 गुण युनिट टेस्ट, 30 गुण सत्रांत परीक्षा तर 20 गुण पूर्वपरीक्षेला दिले जातील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांमधून मुल्याकन पद्धतीवर अनेक प्रश्न विचारले जात होते. त्याला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मोठी घोषणा केलीय. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल मान्य नसेल, त्या निकालावर समाधान नसेल त्यांच्यासाठी कोरोनाची परिस्थिती पाहून ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा घेण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे लेखी परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे
संबंधित बातम्या:
Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
सिंधुदुर्गातील 486 जिल्हा परिषद शाळा बंद होणार, शिक्षण समितीनं का घेतला निर्णय?
CBSE 10th Result 2021 CBSE Class 10 Result will declare before 15 July