नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) बारावीच्या पहिल्या टर्मचा (Class 12 term 1 Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी वेबसाईटवर निकाल पाहता येणार नाही. सीबीएसईकडून बारावीचे निकाल महाविद्यालय आणि शाळांकडे पाठवण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी निकालासाठी महाविद्यालय आणि शाळांकडे (School) संपर्क केल्यास त्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांचे विषय निहाय गुण जारी करण्यात आलेले आहेत. बारावी टर्म परीक्षा 1 चा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार नाही. सीबीएसईकडून विद्यार्थ्यांचे निकाल शाळांकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती एएनआयकडून देण्यात आली आहे.
Central Board of Secondary Education (CBSE) has started sending results of class XII, Part 1 to schools. Students can contact their respective schools for their results: CBSE
— ANI (@ANI) March 19, 2022
सीबीएसईकडून बारावीच्या टर्म 1 परीक्षेचे निकाल शाळांकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. टर्म 1 परीक्षा आणि टर्म 2 परीक्षेचा निकाल एकत्रितपणे मार्कशीटवर आगामी काळात जारी केले जातील. सीबीएसईकडून नव्या शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्म घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या टर्म 1 परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा होती. बारावीचा टर्म 1 परीक्षेचा निकाल शाळा आणि महाविद्यालयांकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात त्यांचे निकाल उपलब्ध होतील.
सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता बारावीच्या टर्म 1 चा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. दहावी आणि बारावीच्या सत्र 2 च्या टर्म 2 परीक्षांचं वेळापत्रक सीबीएसईकडून जाहीर करण्यात आलं होतं. सीबीएसईकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा 05 मे पासून सुरु होईल. ती 24 मे रोजी समाप्त होईल, तर इयत्ता बारावीच्या दुसऱ्या टर्मची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरु होईल आणि 19 मे रोजी समाप्त होईल. परीक्षेचं वेळापत्रक www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.
इतर बातम्या:
CBSE Result : सीबीएसईकडून दहावी टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कुठं उपलब्ध होणार?
CBSE : दहावी बारावी संदर्भात सीबीएसईकडून मोठी घोषणा, दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर