CBSE Result 2022 : अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल (CBSE 12th results 2022) जाहिर करण्यात आला आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली. बारावी सीबीएससी (CBSE) बोर्डाच्या परीक्षेमध्ये (Exam) एकूण 94.54 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 91.25 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के इतका लागला. तर 97.04 टक्के एवढा केंद्रीय विद्यालयाचा निकाल लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये त्रिवेंद्रम अव्वल स्थानावर असून, इतर झोनच्या तुलनेत त्रिवेंद्रम झोनची टक्केवारी ही सर्वाधिक आहे. विद्यार्थी digilocker.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल चेक करू शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीएससीच्या निकालाची चर्चा होती. मात्र निकाल काही लागला नव्हता. अखेर आज सीबीएससी बोर्डाने निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान आज दुपारी दोन वाजता सीबीएसई बोर्डाच्या दाहावीचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत बोर्डाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.आज दुपारी दोन वाजता दाहावीचा निकाल घोषीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. सीबीएसई बोर्डाची टर्म एकची परीक्षा ही एमसीक्यू फॉरमॅटमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. तर टर्म 2 परिक्षा ही डिस्क्रिप्टि स्वरुपात घेण्यात आली होती.