नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबईएसई)च्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने डेट शीट जारी केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. ही परीक्षा 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. बोर्डाने अखेर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तारखा पाहून विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना cbse.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच वेळापत्रक डाऊनलोडही करता येणार आहे. सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीसाठी 1 जानेवारी 2024 पासून प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे.
2024मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यी सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आधीच परीक्षेची पूर्ण तयारी केली आहे. आता वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनाही आपल्या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी वाव मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी आजपासूनच हे नियोजन सुरू केलं आहे.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेची डेटशीट जारी करण्यात आली आहे. केवल पाच स्टेप्सद्वारे ही स्टेप्सशीट डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
1. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2024ची डेटशीट डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट cbse.gov.in किंवा cbse.nic.in वर जावे लागेल.
2. त्यानंतर latest@CBSE section वर क्लि करा
3. त्यानंतर सीबीएसई इयत्ता 10वी आणि 12वीच्या डेटशीटसाठी लेटेस्ट अपडेट लिंकवर क्लिक करा
4. त्यानंतर तुमच्या क्लासच्या लिंकवर क्लिक करा
5. त्यानंतर बोर्ड परीक्षेच्या डेटशीट पीडीएफ लिंकवर क्लिक करून तिला डाऊनलोड करा
दोन विषयाच्यामध्ये पुरेसा गॅप असावा
इयत्ता 12वीची डेटशीट बनवताना JEE Main च्या परीक्षेवर लक्ष ठेवलं पाहिजे
अभ्यासाचं वेळापत्रक बनवताना दोन विषय एकाच विषयी येणार नाही, याची काळजी घ्या
परीक्षा सकाळी 10.30 वाजता असेल
डेटशीट दोन महिने आधीच जारी केलं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पुरेपूर तयारी करावी म्हणून.