नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आज सीबीएसई बोर्ड कंपार्टमेंट परीक्षा 2021 ची डेटशीट जाहीर करेल. श्रेणी सुधार, कंपार्टमेंट, खासगी आणि पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक आज सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपलोड केलं जाणार आहे. सीबीएसईने बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 29 जुलै रोजी आणि 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर केला होता.
पर्यायी मूल्यांकनाद्वारे तयार करण्यात आलेल्या निकालावर जे विद्यार्थी समाधानी नाहीत ते बोर्डाकडून घेण्यात कंपार्टमेंट परीक्षेला उपस्थित राहू शकतात. बोर्ड 10 वी आणि 12 वी साठी 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 पर्यंत श्रेणी सुधारणा आणि कंपार्टमेंट परीक्षा घेईल. कंपार्टमेंट आणि श्रेणी सुधारणा परीक्षा देश आणि परदेशातील नियुक्त केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने ज्या उमेदवारांना ऑफलाइन परीक्षांना बसण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक जारी केलं आहे. जे विद्यार्थी मूल्यांकनाच्या सूत्रानुसार जारी करण्यात आलेल्या निकालाबद्दल संतुष्ट नसतील ते परीक्षांना बसू शकतात. कंपार्टमेंट परीक्षा विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा घेतली जाणार आहे.ही परीक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण अंतिम मानले जातील.
निकालासाठी 20 + 80 चे सूत्र तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन केले जाईल, त्यापैकी 20 गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित 80 गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या 80 गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 10 गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, 30 मध्यावधी परीक्षेसाठी आणि 20 प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 29 जुलै रोजी सीबीएसई 12 वीचा निकाल 2021 जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या वर्षी 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के आहे, तर मुलांचा निकाल 99.13 टक्के आहे.
इतर बातम्या:
CBSE 10th Result 2021Declared: सीबीएसईचा दहावीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा? वाचा सविस्तर
CBSE Board Exams 2021 cbse to release Class 10, 12 compartment date sheet today