नवी दिल्ली: बारावीच्या परीक्षांसदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई (CBSE) आणि सीआयएसीईनं (CICSE) बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. सीबीएसई बोर्डानं जाहीर केलेल्या मूल्यांकन पद्धतीबद्दल आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांची परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाईल, असं सीबीएसईनं सांगितलं आहे. सीआयएससीईनं विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी सप्टेंबरपासून होणाऱ्या परीक्षा देता येतील, असं देखील सांगितलं आहे. (CBSE CISCE told to Supreme Court Class 12 board exam results declared before July 31)
केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कलू सर्टिफिकेट एक्झामिनेशन यांच्याकडून विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाबद्दल काही आक्षेप असतील तर ते दूर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं या समितीकडून समाधान झालं नाही तर त्यांना बोर्डा द्वारे स्थापन करण्यात आलेल्या आणखी समितीकडे पाठवण्यात येईल.
सीबीएसईने कोर्टाला महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘जे विद्यार्थी मुल्यांकन निकषांवर नाराज आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल १२ वीच्या बोर्ड परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत होतील’, असं सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.
केवळ मुख्य विषयांचीच परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत उमेदवाराने मिळविलेले गुण अंतिम मानले जातील. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कसा असावा किंबहुना मूल्यांकन फॉर्म्युला काय असावा याचं धोरण सीबीएसईने निश्चित केले आहे. “एक सुनिश्चित धोरण निश्चित करण्यासाठी, प्रत्येक शाळेला विश्वासार्ह संदर्भांचा वापर करून शालेय पातळीवरील भिन्नता लक्षात घेऊन आंतरिकरित्या गुणांचे मॉडरेशन करावं लागेल,” असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
CBSE Class 12 Exams : 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान बारावीच्या ऑप्शनल परीक्षा, CBSE ची सुप्रीम कोर्टात माहितीhttps://t.co/VVF6lgPKv6#CBSENews #cbseboardexams2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या:
HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, निकालाचा फॉर्म्युला फायनल? पुण्यात बैठकीचं आयोजन
CBSE CISCE told to Supreme Court Class 12 board exam results declared before July 31