CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेची घोषणा, परीक्षेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

| Updated on: Jul 21, 2021 | 6:17 PM

खासगी विद्यार्थ्यांच्या खटल्याची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि त्यानंतर खासगी विद्यार्थ्यांचा निकाल लेखी परीक्षेच्या आधारे तयार होईल, असा निर्णय घेण्यात आला, असं सीबीएसईनं सांगितलं आहे.

CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेची घोषणा, परीक्षेला या तारखेपासून सुरुवात
सीबीएसई
Follow us on

CBSE Private Exam 2021 नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता 12 वीच्या खासगी / कंपार्टमेंट / पत्राद्वारे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. सीबीएसईने सांगितले की 12 वी खासगी / कंपार्टमेंट / पत्राद्वारे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 16 ऑगस्ट 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत घेण्यात येतील.

खासगी विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा होणार

सीबीएसईने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की या विद्यार्थ्यांचा निकाल मूल्यांकन धोरणानुसार तयार करता येणार नाही. बोर्ड किंवा शाळेकडे त्या विद्यार्थ्यांचे पुरेसे रेकॉर्ड नाही. खासगी विद्यार्थ्यांच्या खटल्याची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि त्यानंतर खासगी विद्यार्थ्यांचा निकाल लेखी परीक्षेच्या आधारे तयार होईल, असा निर्णय घेण्यात आला, असं सीबीएसईनं सांगितलं आहे.

खासगी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचा निकाल कमीत कमी वेळात जाहीर करणार, असल्याच सीबीएसईनं सांगितलं आहे. इतकेच नव्हे तर यूजीसी आणि बोर्ड विद्यार्थ्यांचे हित लक्षात ठेवत असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे. मागील वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निकालाच्या आधारे यूजीसी प्रवेश वेळापत्रक ठरवेल, असं सांगण्यात आलं आहे.

बारावीचा निकाल तयार करण्यास मुदतवाढ

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावी निकाल (सीबीएसई बोर्ड निकाल 2021) अंतिम करण्यासाठी अंतिम तारीख 22 जुलै ते 25 जुलै (संध्याकाळी 5) पर्यंत वाढविली आहे. सीबीएसईने आपल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की शाळा त्यांच्या संपूर्ण क्षमतेसह डेटा अंतिम करण्याचे काम करीत आहेत, परंतु अंतिम तारीख जवळ आल्यामुळे शिक्षक दबावाखाली चुका करीत आहेत आणि मग त्यांना दुरुस्त करण्यासाठी सीबीएसईला विनंती करावी लागत आहे.

सीबीएसईने त्यामुळे निकाल निश्चित करण्याची अंतिम तारीख (CBSE class 12th result 2021) 22 जुलै ते 25 जुलै 2021 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे. शाळांना त्यांचे काम सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आलीय. कोणत्याही शाळेचे काम पूर्ण झाले नाही तर त्या शाळेचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.

इतर बातम्या:

CBSE 12th Result 2021 : बारावीच्या निकालासंदर्भात सीबीएसईची महत्वाची नोटीस, येथे पहा

CBSE 10th Result 2021: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता, निकाल कुठे पाहायचा?

CBSE Class 12 private compartment exam 2021 date announced check details here