CBSE CTET 2021 Date नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईन केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. सीबीएसईच्या माहितीनुसार परीक्षा 16 डिसेंबर ते 13 जानेवारी दरम्यान आयोजित केली जाईल. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला असले ते सीबीएसईच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. सीटीईटी परीक्षेत यंदा मोठा बदल करण्यात आला आहे. यावर्षीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. संगणक आधारित सीटीईटी परीक्षा यावर्षी प्रथमच होतं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची अचूक तारीख त्यांच्या प्रवेशत्रावर मिळेल. संपूर्ण देशभरात एकूण 20 भाषांमध्ये परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे.
सीबीएसई दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करते. यापूर्वीच्या सीटीईटीच्या 14 परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनं झाल्या होत्या. सीबीएसईनं यावर्षी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचं ठरवलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षा घेतल्यानं निकाल आणि इतर प्रक्रिया लवकर पार पडेल, असं सीबीएसईचं मत आहे.
अभ्यासक्रमात बदल
सीबीएसईनं सीटीईटी परीक्षेच्या सध्याच्या अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरुपात बदल केला आहेत. प्रश्नपत्रिका ज्ञान, वैचारिक योग्यता, समस्या निकाराकरण क्षमता यावर प्रश्न विचारले जातील. सीबीएसई बोर्डानं डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 मध्ये सीटीईटीचं आयोजन केलं जाईल, असं म्हटलं होतं.
शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 10 ऑक्टोबरला होणार आहे. साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.
अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीच्या प्रवेशाची मुदत संपली असून आता विशेष फेरीअंतर्गत महाविद्यालयीन कोट्यातून प्रवेश सुरु होतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. नियमित फेरीअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 2 लाख 14 हजार 806 विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतला आहे. विशेष फेरीचे प्रवेश 25 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी विशेष फेरीअंतर्गत प्रवेश घ्यावेत, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
इतर बातम्या:
Breaking: 40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
ठाकरे सरकारकडून MAHA TET परीक्षेची घोषणा, संपूर्ण प्रक्रिया कशी असेल? वाचा सविस्तर
CBSE declared CTET exam dates ctet exams held within December and January