नवी दिल्ली: सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. 10 जुलैपर्यंत ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाकडून सीबीएसई दहावीचा निकाल 4 जुलैच्या आसपास आणि बारावीचा निकाल 10 जुलै 2022च्या (CBSE 10th Results 2022) आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. बऱ्याच शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल (CBSE 12th Results 2022) जाहीर केला असला तरी भारत आणि परदेशातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई निकालाच्या विलंबामुळे फटका बसलाय. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षांचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थी आणि शाळांना सात महिन्यांच्या सलग परीक्षेच्या वेळापत्रकदिले, ज्यात दोन बोर्ड, दोन प्री-बोर्ड आणि प्रॅक्टिकल्सचा समावेश आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टर्म-1 मध्ये विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली.त्यानंतर सीबीएसईला निकाल जाहीर करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचं कामही पूर्ण करण्यात आलं आहे. सध्या बोर्ड वेबसाइटवर गुण अपलोड करण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहे. अशा परिस्थितीत या आठवड्याच्या अखेरीस गुण अपलोड करण्याचे काम पूर्ण होऊन पुढील आठवड्यात दहावी, बारावीचे निकाल कधीही बोर्डाकडून जाहीर होतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांचा कल पाहिला तर सीबीएसईकडून दहावीचा निकाल प्रथम जाहीर होत आहे. अशा परिस्थितीत यंदाही दहावीचा निकाल आधी बोर्डाकडून जाहीर होणार आहे. 4 जुलैला दहावीचा निकाल आणि 10 जुलैला बारावीचा निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. दहावीची परीक्षा 24 मे 2022 पर्यंत घेण्यात आली होती. बारावीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत घेण्यात आली होती. यंदा सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती.