CBSE Date Sheet 2021 : सीबीएसई दहावी बारावीच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर करणार, प्रश्नांचं स्वरुप कसं असणार

| Updated on: Oct 18, 2021 | 3:06 PM

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहेत.

CBSE Date Sheet 2021 : सीबीएसई दहावी बारावीच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर करणार, प्रश्नांचं स्वरुप कसं असणार
सीबीएसई
Follow us on

CBSE Date Sheet 2021 नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहेत. सीबीएसईनं 14 ऑक्टोबरला एक परिपत्रक जाहीर करुन यासंदर्भात माहिती दिली होती. सीबीएसईकडून 18 ऑक्टोबर म्हणजे आजचं नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021 च्या सत्र परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी डेटशीट अधिकृत वेबसाईट cbse.nic. in या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात.

प्रश्न कसे असणार?

सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यास यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.

टर्म दोनची परीक्षा कशी असणार?

दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा पहिल्या सत्राच्या परीक्षेपेक्षा वेघळी असेल. त्यामध्ये लघूत्तरी आणि दिर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा दोन तासांची असेल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या सत्राच्या परीक्षेचं महत्त्व हे मुख्य परीक्षेसारखं असेल. पहिल्या सत्राची परीक्षा केवळ दीड तासांची असेल.

परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

ऑफलाईन परीक्षा

सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. बोर्डाने टर्म -1 परीक्षेत 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर तयार केले जातील, असं सांगितलं आहे.

इतर बातम्या:

लहान मुलांमध्ये मानसिक आजारात वाढ, ‘प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ हवे’: तज्ज्ञांच्या सूचना, राज्यपालांच्या उपस्थितीत कार्यक्रम

CBSE Date Sheet 2021 : सीबीएसई दहावी बारावीच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर करणार, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता


CBSE Term 1 Date Sheet 2021 Live Update Class 10th and 12th Exam question pattern details