नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शिक्षणाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी दिली आहे. सन 2019-2020 चा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जारी करण्यास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू, अंदमान निकोबार आणि केरळला सर्वाधिक ग्रेडिंग इंडेक्स मिळालं आहे. (Central Education Minister Ramesh Pokhriyalal approved release Performance Grading index)
परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेच पीजीआय पहिल्यांदा 2017-18 मध्ये जारी करण्यात आला होता. सरकार या द्वारे देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी अंदमान आणि निकोबार, पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू आणि केरळमध्ये 2019-20 मध्ये या राज्यांना लेवल II मध्ये पहिली ग्रेड मिळाली आहे.
Five States and UTs, namely Andaman and Nicobar Islands, Chandigarh, Kerala, Punjab and Tamil Nadu have attained Level II (score 901-950), i.e., Grade I++ in PGI 2019-20. Download full report from here: https://t.co/kTvULvq7Ph pic.twitter.com/pkNYB5jzO0
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) June 6, 2021
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींगच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केला आहे. एनआयओएसनं 19 मे रोजी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सीबीएसई, आयसीएसई पाठोपाठ एनआयओएस बोर्डानं बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे.
संबंधित बातम्या:
दहावीच्या परीक्षा रद्द, आणखी एका बोर्डाचा निर्णय, NIOS च्या बारावीच्या परीक्षा लांबणीवर
(Central Education Minister Ramesh Pokhriyalal approved release Performance Grading index)