सामाईक प्रवेश परीक्षा 22 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल, 2024 (पीसीबी ग्रुप) आणि 02 मे 2024 ते 16 मे 2024 (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण 169 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा 18 सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. या परीक्षेस एकूण 3 लाख 30 हजार 988 विद्यार्थी, 3 लाख 94 हजार 33 विद्यार्थीनी व 31 तृतीयपंथी उमेदवार होते. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यापैकी 6 लाख 75 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी सेल म्हणाले की, उमेदवाराचे एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पध्दत नाही. हा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहे. बरेच पालक येतायत आणि ते मार्कसंदर्भात पॅनिक झाले आहेत. सीईटी सेल कार्यक्षम आणि पारदर्शकपणे काम करत आहे.
मेलने प्रश्न पाठवले त्यांना उत्तरे दिली आहेत. आम्ही आता पालकांच्या भूमिकेत आलोय ना की सीईटी सेलच्या भूमिकेत आता समोर आलोय. पुढे शैलेंद्र देवळणकर, शिक्षण संचालक म्हणाले की, आम्ही तुमच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना संदेश जावा यासाठी पुढे आलोय. सात लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय तो ऑनलाइन पॅटर्न 2020 पासून सुरु आहे.
हाच पॅटर्न फक्त राज्य सरकार नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर जेईई परीक्षा होते तशीच पद्धती वापरली जाते. सन्माननीय उच्च न्यायालयाने देखील हा पॅटर्न एन्डोर्स केला होता. आपण यात इम्प्रुव्ह केलंय. यात कोणत्याही पद्धतीचा अनागोंदी कारभार नाहीये. म्हणजेच सेलकडून हे स्पष्ट करण्यात आले की, परीक्षेत कोणताही अनागोंदी कारभार झाला नाहीये.
दिलीप सरदेसाई म्हणाले की, आम्ही प्रश्नपत्रिका टाकत असतो आणि ऑब्जेक्शन यावे, ते गांर्भियाने घावे अशी आमची भावना असते. पाच हजार प्रश्न होते आणि त्यातील 54 प्रश्नांमध्ये चुका होत्या. यंदा 54 चुका होत्या तर मागच्या वर्षी 42 होत्या. सव्वा सात लाख मुलांनी ही परीक्षा दिली आहे. ऑनलाईनमध्ये इतके पीसी उपलब्ध होत नसतात.
जेईईमध्ये देखील अशीच परीक्षा होत असते. रिमोट परिसरात अशा आयटी इन्फ्रा नाही आहे. कॉम्प्युटरमुळे पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळते. प्रत्येक बॅचमध्ये 50 स्कोअर असेल तर त्याला एकच पर्सेंटाईल आहे. पर्सेंटाईलबद्दल ज्यांना शंका होती, त्यांना विचारले तेव्हा आन्सर की बघितलं का? तर त्यांनी नाही बघितली नंतर त्यांना वाटते की मला जास्त पर्सेंटाईल पडायला पाहिजे होते.
ज्याला वाटेल त्याला त्याची आन्सर की पाहता येईल. आपण दोन ते तीन दिवस आन्सर की ठेवली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी बघितली नसेल तर पुन्हा आपण 26-27 जूनला पुन्हा आन्सर की उपलब्ध करुन देऊ. सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या प्रचारासंदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत. खोट्या क्लिपला बळी पडू नका, असेही त्यांनी सांगितले.
शैलेंद्र देवळणकर यांनी म्हटले की, कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, त्या पलिकडे जाऊन विचार व्हायला हवा. आम्ही पारदर्शकतेसाठी तुमच्या समोर आलो आहोत, आम्ही तुमच्यासाठीच उपलब्ध आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. सेलकडून आता काही गोष्टी या स्पष्ट करण्यात आल्या आहेत.