नवी दिल्लीः नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) कॉमन युनिव्हर्सिटी परीक्षेसाठी (CUET 2022) घेण्यात येत असलेल्या प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनच्या तारखेत बदल केला आहे. एनटीएच्या वेबसाईटवर nta.ac.in याबाबत सुचना देण्यात आली असून त्यानुसार, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षसाठी प्रवेश अर्ज 6 एप्रिलपासून स्वीकारले जाणार आहे. इच्छूक
विद्यार्थींनी CUET परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइटवर जाउन अर्ज करावयाचे आहे. विद्यार्थीं आता 6 मेपर्यंत अर्ज प्रक्रिया करु शकणार आहेत. याआधी CUET साठी रजिस्ट्रशेनची मुदत 2 एप्रिलपासून सुरु होणे अपेक्षीत हेाते. परंतु काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने CUET च्या प्रवेश परीक्षेच्या तारखेत हा बदल (Change) असून या बदलाची माहिती विद्यार्थींना देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, अद्याप CUCET च्या परीक्षेची तारीख निश्चित झाली नसली तरी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने CUET 2022 च्या तारखेत बदल केला तेव्हा याची माहिती विद्यार्थींना देण्यात आल्याचे म्हटले आहे. CUCET ची परीक्षा साधारणत: जुलैच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात घेणे अपेक्षीत आहे. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून CUET च्या परीक्षेमध्ये वारंवार बदल करण्यात येत असल्याने ही एजन्सी परीक्षा घेण्यास सक्षम आहे की, नाही याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, CUET सुरु करण्यामागे महत्वाचे कारण होते ते म्हणजे, विविध राज्यांमधील वेगवेगळे बार्ड परीक्षांची पध्दत. तसेच प्रत्येक बोर्डाकडून देण्यात येत असलेल्या नंबरमध्येही बराच फरक आहे. यात CUET एक गेमचेंजर ठरु शकतो असा विश्वास व्यक्त होत आहे. याचे एखादी उदाहरणच बघायचे झाल्यास, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमध्ये साधारणत: 80 हजार विद्यार्थीं 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतात. प्रवेश परीक्षेचे कटऑफ देखील बरेच जास्त असते. त्यामुळे याचा फटका इतर स्टेट बोर्डाच्या विद्यार्थींना सहन करावा लागत असतो. त्यामुळेच CUET ला या सर्व समस्यांवर तोडग्याच्या रुपात पाहिले जात आहे.
1) CUET किंवा NTA च्या वेबसाईटवर जावे.
2) पृष्ठभागावर CUET 2022 नोंदणी लिंकवर क्लिक करा.
3) स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
4) त्यावर आपली नोंदणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
5) आवश्यक ते सर्व कागदपत्र अपलोड करुन सबमिट करा.
6) अर्जाची एक प्रिंट काढून घ्या.
या चार सेक्शनचा असेल सहभाग
सेक्शन lA : 13 भाषा
सेक्शन lB : 20 भाषा
सेक्शन ll : 27 डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट
सेक्शन lll : सामन्या परिक्षा
UPSC संयुक्त वैद्यकीय सेवेच्या 687 जागांसाठी भरती प्रक्रिया… ही आहे शेवटची तारीख
PG प्रोग्रामसाठी प्रवेश प्रकियेला सुरुवात… पात्रता व महत्वाच्या तारखा जाणून घ्या
UGC आता घेऊन येत आहे नवीन नियम, प्राध्यापक बनण्यासाठी आता PhD, NET ची गरज नाही