मुंबई : विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. तर विभागात कोकणने बाजी मारली आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. आता या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. विद्यार्थी अन् पालकांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शनिवारपासून मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
कधीपर्यंत करता येणार अर्ज
मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यांलयांमध्ये पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 27 मे (शनिवार) 2023 पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी 12 जून 2023 या अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
तीन यादी लागणार
प्रवेश अर्ज कसा भरावा
बारावीचा विभागावार निकाल
पोरीच हुश्शार
यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण 91.25 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात विद्यार्थींनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. या परीक्षेत एकूण 6,84,118 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 6,08,350 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
हे ही वाचा
Courses After HSC : बारावीनंतर काय? एका चार्टमधून जाणून घ्या सर्व अभ्यासक्रमांची माहिती