मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 36265 वर गेला आहे. बुधवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल 36 हजार 265 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत आणखी 79 जणांची भर पडली. राज्यात आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 381 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांपुढे दहावी आणि बारावीच्या पूर्व परीक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. दहावी बारावीच्या पूर्व परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन घ्यायच्या असा प्रश्न शाळा महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी पहिली ते बारावीचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सुरु आहेत. दहावी बारावीचे वर्गही ऑनलाईन सुरु करण्यात आल्यानं पूर्व परीक्षांच्या आयोजनाचा प्रश्न निर्माण झालाय.
दहावी बारावीचे वर्ग आता ऑनलाईन सुरु करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयांनी दहावी बारावीच्या पूर्व परीक्षा जानेवारी फेब्रुवारीत प्रस्तावित केल्या होत्या. मात्र कोरोनाच्या वाढत्या स्थितीमुळं शाळा ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पूर्व परीक्षा कशी पार पडणार असा प्रश्न निर्माण झालाय.
सद्यस्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट असल्याचं सांगितलं आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय बोर्डाला कळालेला नाही. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं बोर्डाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.
इतर बातम्या:
राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार, 700मेट्रीक टन ऑक्सिजन लागल्यास पूर्ण लॉकडाऊन :राजेश टोपे
Corona cases increased in state schools and colleges facing problem to conduct pre exams offline