बारावीनंतर पुढं काय? हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राविषयी जाणून घ्या, वाचा सविस्तर

| Updated on: Aug 12, 2021 | 7:22 AM

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारंपारिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याऐवजी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतल्यास त्यांच्या करिअरला वेगळं वळण निर्णय देणारा निर्णय ठरु शकतो.

बारावीनंतर पुढं काय? हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राविषयी जाणून घ्या, वाचा सविस्तर
प्रातनिधिक फोटो
Follow us on

मुंबई: भारतात गेल्या काही वर्षांपासून पर्यटन आणि हॉस्पिटलिटीसह हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारंपारिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याऐवजी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतल्यास त्यांच्या करिअरला वेगळं वळण निर्णय देणारा निर्णय ठरु शकतो. हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटलटी क्षेत्र सातत्यानं वाढत असल्यानं या क्षेत्रात करिअरच्या चागंल्या पगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र नेमकं काय?

हॉस्पिटलिटी आणि हॉटेल इंडस्ट्रीचा विस्तारानं अभ्यास हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात केला जातो. यामध्ये हॉटेल, मॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट मॅनेजमेंट कोर्स, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं शिक्षण देशभरातील विविध संस्थातून दिलं जातं.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रांना प्रवेश घेऊ शकतात?

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्राला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सहा महिन्यांचा असून, डिप्लोमा हा एका वर्षाचा किंवा दोन वर्षांचा असेल. तर पदवी अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा आहे. शासकीय हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या एनसीएचम जेईई ही परीक्षा द्यावी लागेल.

बारावीनंतरचे अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट, बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए इन हॉस्पिटलिटी , ट्रॅव्हल अँड टुरिझम, बीबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट,

दहावीनंतरचे अभ्यासक्रम

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन, डिप्लोमा इन फुड अँड बेवरेज सर्व्हिसेस, डिप्लोमा इन फुड अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम

पदवीनंतरचे अभ्यासक्रम

मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर इन टुरिझम अँड हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, एमएससी टुरिझम अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, एमबीए हॉस्पिटलिटी

महाराष्ट्रातील प्रमुख शहरात हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम चालवले जातात.

शासकीय हॉटेल मॅनेजमेंट महाविद्याल्यातील प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेमध्ये इंग्रजी, रिझनंगि अबॅलिटी, जनरल नॉलेज, गणितीय क्षमता यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

कोणत्या पदांवर नोकरी मिळते?

हॉटेल मॅनेजमेंटमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजर, इंव्हेंट मॅनेजर,एक्झ्युकेटिव्ह शेफ,इव्हेंट को-ऑर्डिनेटर, हाऊसकिपींग मॅनेजर, हॉटेल डायरेक्टर, रिसॉर्ट मॅनेजर आदी पदावंर नोकरी मिळते.

इतर बातम्या:

बारावीनंतरचे अभ्यासक्रम : IIT मद्रासचा ऑनलाईन डाटा सायन्स डिप्लोमा, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

बारावी नंतर पुढे काय? कला शाखेतून कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा? वाचा सविस्तर

JEE Main 2021 Result: जेईई मेन परीक्षेचा निकाल लवकरच जारी होणार, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

Courses after class 12 in hotel management check details here