कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR), नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएसआयआर नेट जून २०२२ परीक्षेत भाग घेतलेल्या सर्व उमेदवारांचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. सीएसआयआर नेट प्रवेशपत्र लिंक सीएसआयआरच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. https://csirnet.nta.nic.in या लिंकवर हे प्रवेशपत्र उपलब्ध आहे. यावर्षी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट 2022 परीक्षा 16, 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सकाळची शिफ्ट सुरू होणार आहे. दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते 6:00 दरम्यान घेण्यात येईल.
उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित परीक्षा केंद्रांवर सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
वेळापत्रकात काही गोंधळ झाल्यास उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अधिकृत सूचनेनुसार, सीएसआयआर नेट प्रवेशपत्र आज, 13 सप्टेंबर 2022 रोजीच जारी केले जाणार होते, जे आता उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.