CUET Exam 2022: CUET कट ऑफ कशाच्या आधारे ठरवला जाणार? 12वीचे गुण महत्त्वाचे की CUET चे?

| Updated on: Jul 17, 2022 | 9:04 AM

CUET Cut Off: कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. पहिला टप्पा जुलैमध्ये घेण्यात येत आहे आणि दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये होणार आहे.

CUET Exam 2022: CUET कट ऑफ कशाच्या आधारे ठरवला जाणार? 12वीचे गुण महत्त्वाचे की CUET चे?
Educational Loan
Image Credit source: indianexpress.com
Follow us on

CUET परीक्षा (CUET Exam 2022) दोन टप्प्यात घेतली जाते. पहिला टप्पा जुलैमध्ये तर दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्राची निवड केली आहे त्यांना CUET परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट केलंय कारण NEET UG 2022 (NEET UG 2022) 17 जुलै, आज घेण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता भारतातील आणि परदेशातील 510 हून अधिक शहरांमधील परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू झाली. अशा परिस्थितीत, CUET परीक्षेचा कट ऑफ (CUET Cut Off) कसा ठरवला जाईल ते जाणून घेऊया.

CUET परीक्षेचा कट ऑफ कसा ठरवला जाईल?

CUET परीक्षेचा कट ऑफ ठरवण्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून असेल. याशिवाय इतरही अनेक घटक असतील ज्यांच्या आधारे कट ऑफ तयार केला जाईल. यंदा CUET परीक्षेसाठी १४.९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याच वेळी, केंद्रीय 2 विद्यापीठांमध्ये उपलब्ध जागांची संख्या, विद्यार्थ्याची श्रेणी, परीक्षेतील अडचण आणि परीक्षेतील उमेदवाराची कामगिरी या घटकांचा देखील समावेश केला जाईल ज्याच्या आधारे कट ऑफ निश्चित केला जाईल. एकूणच या सर्व बाबी लक्षात घेऊन कट ऑफ तयार करण्यात येणार आहे.

 12 वीचे नाही तर CUET चे गुण अनिवार्य!

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी मार्चमध्ये घोषणा केली होती की 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12वीचे नाही तर CUET चे गुण अनिवार्य असतील. विद्यापीठे त्यांचे स्वतःचे किमान पात्रता निकष निश्चित करू शकतात. CUET हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असून परीक्षेत जे काही आव्हान उरले आहे ते लवकरात लवकर सोडवले जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

डीम्ड विद्यापीठेही सीयूईटीद्वारे देणार प्रवेश

सीयूईटीच्या माध्यमातून देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये ग्रॅज्युएशन म्हणजेच यूजी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर काही डीम्ड विद्यापीठेही त्याद्वारे प्रवेश देतील. विशेष म्हणजे यावेळी दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि बीएचयूसह अलाहाबाद विद्यापीठात सीयूईटीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे.