CUET PG 2022 Exam Timetable: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सविस्तर अधिसूचनेनुसार, सीयूईटी पीजी 2022 परीक्षा 01 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल. परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना nta.ac.in किंवा cuet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून वेळापत्रक डाऊनलोड करता येईल. यावर्षी, CUET (PG) – 2022 संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये आयोजित केली जाईल. ही परीक्षा भारताबाहेरील अंदाजे 500 शहरे आणि 13 शहरांमध्ये घेतली जाईल. शैक्षणिक सत्र 2022-2023 साठी 66 केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांसाठी पदव्युत्तर प्रवेश परीक्षा घेण्याची जबाबदारी एनटीएवर सोपविण्यात आली आहे.
सीयूईटी पीजी परीक्षा 01, 02, 03, 04, 05, 06, 07, 09, 10 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
ॲडव्हान्स सिटी इन्टिमेशन आणि ॲडमिट कार्ड रिलीज करण्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. सीयूईटी (पीजी) २०२२ भाषा आणि साहित्य पेपर वगळता इंग्रजी आणि हिंदी (द्विभाषिक) मध्ये आयोजित केली जाईल.
यंदा सीयूईटी पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10:00 ते दुपारी 12:00 या वेळेत होणार आहे. दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते 5:00 दरम्यान घेण्यात येईल. ही परीक्षा दोन तासांच्या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.