CUET PG Admit Card: CUET PG ॲडमिट कार्ड जारी! ‘या’ लिंकवर जाऊन डाउनलोड करा

| Updated on: Sep 04, 2022 | 9:16 AM

नॅशनल टेस्टिंग एजन्सी दोन शिफ्टमध्ये सीयूईटी पीजी परीक्षा घेत आहे. पहिल्या शिफ्टच्या परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहेत. दुसऱ्या शिफ्ट अंतर्गत दुपारी 3 ते 5 या वेळेत परीक्षा होणार आहे.

CUET PG Admit Card: CUET PG ॲडमिट कार्ड जारी! या लिंकवर जाऊन डाउनलोड करा
CUET PG Result
Image Credit source: Social Media
Follow us on

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) सीयूईटी पीजी 2022 परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर केले आहे. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सीयूईटी पीजी 2022 ॲडमिट कार्ड (CUET PG 2022 Admit Card) जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार cuet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन सीयूईटी पीजी ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. सीयूईटी पीजी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या उमेदवारांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. उमेदवारांनी अर्जावरून अर्ज क्रमांक तपासून घ्यावा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी दोन शिफ्टमध्ये सीयूईटी पीजी परीक्षा घेत आहे. पहिल्या शिफ्टच्या परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहेत. दुसऱ्या शिफ्ट अंतर्गत दुपारी 3 ते 5 या वेळेत परीक्षा होणार आहे. सीयूईटी पीजी परीक्षा संगणक आधारित चाचणी मोड (CBT Mode) मध्ये आयोजित केली जात आहे. ॲडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून ते डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊट घ्यावी. ॲडमिट कार्ड शिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

CUET PG ॲडमिट कार्ड 2022 कसे डाउनलोड करावे?

  • सीयूईटी पीजी ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी, cuet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर ॲडमिट कार्डची लिंक दिसेल.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर, मागितलेली माहिती भरा.
  • तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन भरावा लागेल.
  • ही तीन माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

सीयूईटी पीजी ॲडमिट कार्ड 2022 थेट लिंक

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट किंवा एसएआय सीयूईटी ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा आहे.

ही परीक्षा घेण्याची जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे देण्यात आली आहे. एनटीए ही शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक स्वतंत्र संस्था आहे.

2022-23च्या शैक्षणिक सत्रासाठी सीयूईटी पीजी परीक्षा घेण्यात येत आहेत. एकूण 42 विद्यापीठांसाठी प्रथमच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे.