नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रॅज्युएट (CUET UG) 2022 फेज 6 परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर केले आहे. cuet.samarth.ac.in अधिकृत वेबसाइटवर सीयूईटी प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड लिंक सक्रिय केली गेली आहे. विद्यार्थी त्यांच्या अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे वेबसाइटवर साइन इन करून सीयूईटी यूजी फेज 6 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. एनटीए 24 ते 30 ऑगस्ट 2022 दरम्यान सीयूईटी परीक्षेचा टप्पा 6 आयोजित करीत आहे.
एनटीए सीयूईटी फेज सहाची परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा भारतातील २५९ आणि देशाबाहेरील 10 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, रोल नंबर, प्रवेश परीक्षेची तारीख, प्रवेश परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा तपशील, उमेदवाराची स्वाक्षरी यासह त्याचा फोटो व इतर आवश्यक माहिती पाहता येणार आहे. सीयूईटी 2022 चे ॲडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यावर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सीयूईटी यूजी फेज 6 ची परीक्षा 2.86 लाख मुले देणार आहेत. “जे उमेदवार तांत्रिक कारणांमुळे किंवा केंद्र रद्द केल्यामुळे आधीच्या टप्प्यात परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांना 24 ते 30 ऑगस्ट 2022 दरम्यान होणाऱ्या फेज 6 मध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल.” याशिवाय अनेक केंद्रांवर परीक्षाही रद्द करण्यात आली होती. अशा परिस्थितीत या समस्यांना तोंड देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. पण आता पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे.