पुणे: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Mahrashtra Board SSC Results) लागून पंधरा दिवस उलटलेत. आता सगळं लक्ष लागून आहे ते म्हणजे सीबीएसई दहावीच्या निकालाकडे. या निकालाकडे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचं देखील लक्ष लागून आहे त्याला कारण म्हणजे अकरावी प्रवेश! अकरावी प्रवेश प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा अन्य बोर्डाच्या दहावीचा निकाल लागणार आहे. काल सीबीएसईच्या दहावीचा निकाल (CBSE 10th Results 2022) लागेल अशी शक्यता वर्तविली जात होती. विद्यार्थी आणि पालकवर्ग आतुरतेने या निकालाची वाट पाहत होता पण काल काही कारणास्तव हा निकाल जाहीर झाला नाही. निकालाची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही पण सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीच्या प्रवेशाची (11th Admissions) पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने केलं स्पष्ट केलंय. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली माहिती
राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून जवळपास पंधरा दिवस झालेयंदा प्रथमच राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या आधी जाहीर केला तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झालेली आहे. त्यामुळे पालकवर्ग चिंतीत आहे. आयजीसीएसई आणि एनआयओएस वगळता अन्य शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरवर्षी अकरावीच्या राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी पाच टक्के विद्यार्थी सीबीएसईचे असतात. आकडा तसा गृहीत धरण्यासारखाच असल्यानं सगळ्याच विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा यासाठी शासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतलाय.