CBSE 12th Result 2021 नवी दिल्ली : सीबीएसईने 12 वीच्या परीक्षा रद्द करुन मुल्यांकन पद्धतीनुसार निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावर अनेक विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत. ही नाराजी अगदी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्यापर्यंत पोहचली (CBSE 12th Result 2021). त्यानंतर आता रमेश पोखरियाल यांनी नाराज विद्यार्थ्यांना त्यांचं नुकसान होणार नाही असं आश्वासन देत महत्त्वाची घोषणा केली. यानुसार जे विद्यार्थी बारावीच्या मुल्यांकन पद्धतीने घोषित केलेल्या निकालावर समाधानी नसतील त्यांना लेखी परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा कधी घेणार याचीही शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलीय (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank answer question of students about CBSE 12th Result 2021).
केंद्रीय शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank) म्हणाले, “सीबीएसईच्या बारावीच्या निकालावर जे विद्यार्थी नाराज आहेत त्यांच्यासाठी ऑगस्टमध्ये परीक्षेचं आयोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा केंद्र सरकारसाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे.”
शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. ते म्हणाले, “ज्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत मी त्यांना विश्वास देतो. जर तुम्ही तुमच्या मुल्यांकनावर समाधानी नसाल तर काळजी करु नका. तुमच्यासाठी आम्ही ऐच्छिक परीक्षेचं आयोजन करु. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांना न्याय मिळाला नाही असं वाटतंय त्यांच्या क्षमतेसोबत नक्कीच न्याय होईल. कोरोना परिस्थिती निवळली की आम्ही ऑगस्टमध्ये परीक्षा घेऊ. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेऊ नका.”
सीबीएसईचा बारावी निकाल (CBSE 12th Result 2021) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. सीबीएसईच्या शाळांना बोर्डाने तसे निर्देश दिलेत. अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांना मिळालेले गुण 30 जूनपर्यंत अपलोड करण्यात आलेत. याशिवाय सीबीएसईने शाळांना प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट मार्क्स 5 जुलैपर्यंत अपलोड करण्यास सांगितलेत. निशंक म्हणाले, “मी पुन्हा एकदा सांगतो की मी तुमच्याशी सातत्याने बोलत आलो आहे.”